Home /News /auto-and-tech /

टाटा मोटर्सची ग्राहकांसाठी मोठी घोषणा; केली मोफत वाहन सर्व्हिसिंगच्या मुदतीत वाढ

टाटा मोटर्सची ग्राहकांसाठी मोठी घोषणा; केली मोफत वाहन सर्व्हिसिंगच्या मुदतीत वाढ

टाटा मोटर्सनं(Tata Motors)आपल्या ग्राहकांचं नुकसान होऊ नये यासाठी एक योजना दाखल केली आहे. त्यामुळे असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

    नवी दिल्ली:देशात सध्या पसरलेल्याकोरोना साथीच्या(Corona Pandemic)दुसऱ्या लाटेमुळे अनेक ठिकाणीलॉकडाउन (Lockdown)लागू करण्यात आला आहे. तसंच अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. यामुळे लोकांना ठराविक वेळेतच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली असून,अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने,मॉल,कंपन्या बंद आहेत. बाहेर फिरण्यावर,प्रवासावर निर्बंध असल्यानं नागरिकांची अनेक कामं रखडली आहेत. अनेक लोकांना आपल्या वाहनांचे सर्व्हिसिंग करून घेता आलेलं नाही. अनेक ठिकाणी सर्व्हिसिंग सेंटर्स,वाहन कंपन्यांच्या डीलरशिप्स बंद आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांची मोफत सर्व्हिसिंगची मुदत उलटून गेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सनं(Tata Motors)आपल्या ग्राहकांचं नुकसान होऊ नये यासाठी एक योजना दाखल केली आहे. त्यामुळे असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. टाटा मोटर्सने1एप्रिल ते30मे दरम्यान विनामूल्य सेवेची(Free Servicing)तारीखअसणाऱ्याप्रवासी वाहनाच्या ग्राहकांसाठी ही मुदत 30जूनपर्यंतवाढवली आहे. आता हे ग्राहक जूनपर्यंतत्यांच्या वाहनांची नि:शुल्क सर्व्हिसिंग करून घेऊ शकतील.अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्यानंबर्‍याच लोकांना त्यांच्या वाहनाचंसर्व्हिसिंग(Vehicle Servicing)करून घेणं शक्य झालेलं नाही आणित्यांची विनामूल्य सेवेचीतारीखही निघून गेली.त्यामुळंटाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठीहीविनामूल्य सेवेचीमुदतवाढवण्याची घोषणा केली आहे. किलोमीटर वाढण्यात आलेले नाहीत :कंपनीनं मुदत वाढवली असूनकिलोमीटर वाढवलेले नाहीत. त्यामुळं आपण अटींनुसार किलोमीटर पूर्णकेलेले असतील तरआपल्याला हा लाभ मिळणार नाही. कोविड-19(Covid-19)च्या वाढत्याप्रादुर्भावामुळे लोकांच्या प्रवासावर निर्बंध आहेत.त्यामुळेकंपनीच्यादेशभरातील ग्राहकांना त्यांची वाहनेसर्व्हिस सेंटरवरपाठवता येत नाहीत. यामुळे त्यांच्या वाहनांची देखभाल किंवा दुरुस्ती करता येत नाही. कंपनीच्या धोरणांनुसारमुदतवाढ :याबाबतकंपनीचे ग्राहक सेवा प्रमुख डिंपल मेहता म्हणाले की,जेव्हा वॉरंटी(Warrant)आणिविनामूल्य सेवा(Free Service)देण्याची वेळ असेलतेव्हा कंपनीच्या धोरणानुसार(Company Policy)ती वाढवली जाईल.आम्ही आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहोत.म्हणूनच एप्रिल आणि मेमध्ये ज्या ग्राहकांची वॉरंटी आणि विनामूल्यसेवेची मुदत संपतहोती,त्यांना हाकालावधी वाढवून देण्यात आला आहे. ग्राहक,विक्रेते आणि पुरवठादार यांच्याहिताचं रक्षण करण्यासाठी बिझनेस एजिलिटी(Business Agility)योजना सुरूकरण्यात आल्याचंकंपनीनं नुकतंचजाहीरकेलं आहे.
    First published:

    Tags: Auto expo, Tata group

    पुढील बातम्या