महिंद्राच्या Thar ला टक्कर देण्यासाठी येते फोर्सची नवी Gurkha, जाणून घ्या फिचर्स

महिंद्राच्या Thar ला टक्कर देण्यासाठी येते फोर्सची नवी Gurkha, जाणून घ्या फिचर्स

फोर्स मोटर्स लवकरच आपली दमदार जीप गोरखाचं नवी मॉडेल लाँच करणार

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : फोर्स मोटर्स लवकरच आपली दमदार जीप गोरखाचं नवी मॉडेल लाँच करणार आहे.  नेक्स्ट जनरेशन Gurkha SUV ची काही दिवसांपूर्वी पुण्यात चाचणी करण्यात आली होती. त्याचे फोटो व्हायरल झाले होतो.

ऑटोकार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आता ही कार आपल्या चाचणीत अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे आणि लवकरच या कारवरून पडदा उठवला जाणार आहे. अशीही  माहिती मिळतेय की, Gurkha SUV चं नवीन मॉडेल पुढील फेब्रुवारी महिन्यात ऑटो एक्सपोमध्ये पाहण्यास मिळणार आहे.

पहिल्यापेक्षा अधिक दमदार

नवी फोर्स Gurkha मध्ये मस्टी-लिंक सस्पेंशन सेटअप, लो-रेंज ट्रान्सफर केस आणि ऑफ रोड गिअर सारखे फिचर्स पाहण्यास मिळणार आहे. जे आधीच्या मॉडेलपेक्षा आणखी दमदार आहे. या गाडीचे नवे फोटो पाहिल्यावर गोरखा नेक्स्ट जनरेशन बाहेरून नव्या रूपात दिसेल. परंतु, या कारचा अंदाज हा अगदी एययुव्ही सारखाच असणार आहे. तसंच गाडीची चेसी आणखी दणकट करण्यात आली आहे. त्यामुळे या कारला क्रॅश टेस्ट पास करण्यात मदत होईल.

मॉडर्न आणि रेट्रो लूक

या कारची मागील व्हील हे आणखी आकर्षक रूप देते. यात सिंगल रियर व्हू विंडो दिली आहे. कारचे टॉप मॉडेलमध्ये अलॉय व्हील्स दिले जाणार आहे. सोबतच यात अंतर्गतही बदल करण्यात आले आहे. त्यामुळे ही गाडी मॉडर्न आणि रेट्रो लूक देते.

इंजिन

गोरखामध्ये 2.2 अपडेटेड डिझेल इंजिन दिले जाणार आहे. ही गाडी बीएस-6 मानांकनसह लाँच केली जाणार आहे. 2.2 लिटरचे  Gurkha Extreme च्या इंजिन सारखचं हे इंजिनही 140bhp ची ताकद देईल. या कारचा थेट सामना हा महिंद्राच्या थारसोबत होईल. महिंद्रा थारचं नवी मॉडेल या महिन्यात लाँच करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2020 10:12 PM IST

ताज्या बातम्या