Home /News /auto-and-tech /

तंत्रज्ञानाला सलाम! स्मार्ट रस्त्यावर गाडी नुसती चालल्यावर Electric Vehicle होणार Charge

तंत्रज्ञानाला सलाम! स्मार्ट रस्त्यावर गाडी नुसती चालल्यावर Electric Vehicle होणार Charge

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

भारताबाहेरही अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या जातात. त्यापैकी स्वीडनने चार्जिंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक खास प्रकल्प राबवला आहे.

    मुंबई, 25 जून : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) वापर सध्या हळूहळू वाढू लागला आहे. रस्त्यावर अनेक इलेक्ट्रिक वाहनं धावताना दिसतात. इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधन समस्येवर तोडगा निघू शकतो हे खरं असलं, तरी विजेची समस्या म्हणजेच गाड्यांच्या चार्जिंगची समस्या कशी सोडवणार? हा प्रश्न काही सुटत नाही. यासाठी चार्जिंग स्टेशन्स (Charging Stations) उभारणं हा एक पर्याय आहे; मात्र तो अजून फारसा दृष्टिपथात आला नाही. त्यामुळेच लांबचा पल्ला गाठायचा असेल, तर इलेक्ट्रिकपेक्षा नेहमीच्या इंधनावर चालणारी गाडी हाच पर्याय योग्य ठरतो. भारताबाहेरही अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या जातात. त्यापैकी स्वीडनने चार्जिंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक खास प्रकल्प राबवला आहे. 'झी न्यूज हिंदी'नं त्याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे. गाड्यांचं चार्जिंग करता यावं, यासाठी स्वीडनमध्ये (Sweden) एक प्रकल्प राबवण्यात आला. त्यामुळे त्यांची ही अडचण मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिथल्या एका टीमनं मोठी इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्यासाठी 'स्मार्ट रोड' (Smart Road For Charging) बनवला आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी ते या रस्त्यावरून चालवावं लागेल. विशेष म्हणजे या रस्त्यावर कोणत्याही चार्जिंग पॉइंटला जोडणारी वायर असणार नाही. त्यामुळे वायरींचं जाळंही इथे नसेल. (बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, 48 तासांत द्यावं लागणार उत्तर) स्टॉकहोमच्या दक्षिणेला 200 किलोमीटर्स अंतरावर असलेल्या गॉटलँड या स्वीडिश बेटावर हा रस्ता बनवण्यात आला आहे. हा (Smart Road) स्मार्ट रस्ता 1.6 किलोमीटर लांबीचा आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर कोणाला विजेचा शॉक लागण्याची शक्यता नाही. त्याचं कारण चार्जिंगच्या वायर्स रस्त्याच्या खाली आहेत. त्या रस्त्यावर वायर्स दिसत नसल्यानं शॉक लागण्याची भीतीही नाही. हा चार्जिंग करणारा रस्ता इतर रस्त्यांसारखाच दिसतो. अवजड वाहनं आणि ट्रक चार्ज करण्यासाठी बनवण्यात आलेला हा जगातला पहिलाच रस्ता आहे. सध्याच्या परिस्थितीत, इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांसाठी त्याचं चार्जिंग हाच कळीचा मुद्दा असतो. दूरच्या प्रवासाला जाता, मध्येच चार्जिंग संपलं तर काय होईल, एकदा चार्ज केल्यावर गाडी किती अंतर धावेल अशा अनेक शंका वाहनचालकांच्या मनात असतात; मात्र असा रस्ता तयार झाला, तर या शंकांवर नक्कीच उत्तर सापडेल. स्वीडनसारख्या देशांनी चार्जिंगसाठी पर्याय उपलब्ध केले आहेत. आपल्या देशातही त्या दृष्टीनं काही प्रयत्न होत आहेत; मात्र अजूनही लांबच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक कार उपयोगी ठरेल का, याबाबत नागरिक साशंक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशक्य गोष्टीही शक्य होत आहेत. काही वर्षांपूर्वी इंधनावर चालणाऱ्या गाड्या विजेवर चालतील, याचा कोणी विचारही केला नसेल; मात्र आता ते सहज शक्य झालं आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांचा पुढचा मार्ग सुकर करण्यासाठी त्यांच्या चार्जिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी असेच काही उपाय पुढे येणं गरजेचं आहे.
    First published:

    Tags: Electric vehicles

    पुढील बातम्या