Home /News /auto-and-tech /

Svitch Motocorp इलेक्ट्रिक बाईक लाँच; एकदा चार्ज करा 110 किमीपर्यंत नो टेन्शन

Svitch Motocorp इलेक्ट्रिक बाईक लाँच; एकदा चार्ज करा 110 किमीपर्यंत नो टेन्शन

एका वेळेस बॅटरी चार्ज केल्यानंतर बाइक 110 किलोमीटरपर्यंत चालते. या बाइकची सर्वाधिक गती 120 किमी प्रतितास आहे.

एका वेळेस बॅटरी चार्ज केल्यानंतर बाइक 110 किलोमीटरपर्यंत चालते. या बाइकची सर्वाधिक गती 120 किमी प्रतितास आहे.

एका वेळेस बॅटरी चार्ज केल्यानंतर बाइक 110 किलोमीटरपर्यंत चालते. या बाइकची सर्वाधिक गती 120 किमी प्रतितास आहे.

    नवी दिल्ली, 30 जून : हौसेला काही मोल नाही, अशी एक प्रचलित म्हण आहे. जगात नानाविध प्रकारचा छंद जोपासून स्वत:ची हौस भागवणारे असंख्य लोक पाहायला मिळतील. यात बाईकप्रेमींबद्दल (Bike Lover) बोलले तेवढे कमीच आहे.दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरांमुळे काही जणांचा हिरमोड होणं साहजिक आहे; पण आता इलेक्ट्रिक बाइकचा (Electric Bike) पर्याय उपलब्ध झाल्याने ही चिंता मिटली असून स्वछंद बाइकस्वारीचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. कारण स्विच मोटोकॉर्पने (Svitch Motocorp) भारतात स्विच सीएसआर 762 इलेक्ट्रिक मोटारबाइक लाँच केली आहे. CSR 762 या इलेक्ट्रिक बाइकची एक्स शोरूम (Ex-Show Room) किंमत 1.65 लाख रुपयांच्या घरात असली तरी यावर 40 हजारांपर्यंत सबसिडी मिळत असल्याने बाइकप्रेमींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असताना बाइक खरेदी करताना बरेचजण सध्या आपल्या खिशाची काळजी घेताना दिसत आहेत. ऑटोमोबाइल (Automobile) क्षेत्रात नवनवीन स्टार्टअप्स (Start-up) येत आहेत. भारतातही इलेक्ट्रिक वाहनांचे नवनवीन प्रकार उपलब्ध होत आहेत. दुचाकीच्या बाबतीत सध्या स्विच मोटोकॉर्पने CSR 762 ही बाइक लाँच केली. या प्रकल्पावर कंपनी 2022 या वर्षात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. CSR 762 या बाइकचं डिझाईन आशियाई सिंहांना (Asiatic lion) समोर ठेऊन तयार करण्यात आलं आहे. जाणून घ्या ई-बाइकची वैशिष्ट्यं स्विच CSR 762 या बाइकसोबत 3.7 किलोवॅट-आवर लिथियम-आयन बॅटरी पॅक बसवले गेले आहे. यातून 10 किलोवॅटची शक्ती निर्माण होऊन 56 एनएम पीक टॉर्क तयार होतो. विशेष म्हणजे बॅटरीची आदला-बदलीही करता येऊ शकते. इलेक्ट्रिक बाइकला कम्बाइन्ड चार्जिंग स्टेशनवर (Combined Charging Station) सीसीएस (CCS) बॅटरी चार्जर लाऊन चार्ज करता येते. एका वेळेस बॅटरी चार्ज केल्यानंतर बाइक 110 किलोमीटरपर्यंत चालते. या बाइकची सर्वाधिक गती 120 किमी प्रतितास आहे. बाइकसोबत मिळतात तीन रायडिंग मोडस् ‘CSR 762’ या इलेक्ट्रिक बाइकसोबत कंपनीने 3 रायडिंग मोड्स उपलब्ध केले आहेत. यात स्पोर्ट्स, रिव्हर्स आणि पार्किंग असे तीन मोड असणार आहेत. या बाइकच्या सेंट्रल ड्राइव्ह सिस्टिमसोबत सर्वांत शक्तिशाली 3 किलोवॅट क्षमतेची मॅग्नेट सिंक्रोनस मोटार लावली गेली आहे. याशिवाय या इलेक्ट्रिक बाइकसोबत 5 इंच टीएफटी कलर डिस्प्ले (TFT Colour Display) आणि ओव्हरहिटंगपासून (Overheating) संरक्षणासाठी थर्मोसाइफन कुलिंग सिस्टिम (Thermosyphon Cooling System) उपलब्ध करण्यात आली आहे.
    First published:

    पुढील बातम्या