नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : टू-व्हिलर सेक्टरमध्ये चांगल्या मायलेज बाइकप्रमाणे, चांगलं मायलेज देणाऱ्या स्कूटरचीही मोठी रेंज आहे. ज्यात Hero, TVS, Yamaha सारख्या कंपन्यांच्या स्कूटर आहेत. यापैकी Suzuki Access 125 चांगल्या फीचर्ससह, उत्तम रेंजमधील स्कूटर ओळखली जाते. चांगलं मायलेज आणि तुलनेने किंमतही कमी असल्याने या स्कूटरची मोठी विक्री आहे.
Suzuki Access 125 खरेदी करायची असल्यास 73,400 रुपयांपासून 82,600 रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. परंतु एका ऑफरअंतर्गत ही स्कूटर केवळ 25 हजारात, अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करता येईल.
Suzuki Access 125 स्वस्तात खरेदीची संधी आहे. ही ऑफर सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या ऑनलाइन वेबसाइट CARS24 वर आहे. CARS24 ने ही गाडी आपल्या वेबसाइटवर लिस्ट केली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटरचं मॉडेल 2014 चं आहे आणि याची फर्स्ट ओनरशिप आहे.
स्कूटर आतापर्यंत 3,932 किलोमीटर चालली आहे. स्कूटर खरेदी केल्यानंतर कंपनीकडून काही नियमांसह 1 वर्षांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देण्यात येत आहे. मनी बॅक गॅरंटीनुसार, ही स्कूटर खरेदी केल्यानंतर 7 दिवसांत ती पसंत न पडल्यास किंवा स्कूटरमध्ये काही समस्या आल्यास अशा वेळी स्कूटर कंपनीत परत करता येते. त्यानंतर कंपनी गाडीचे पूर्ण पैसे परत करेल.
काय आहेत स्पेसिफिकेशन्स -
कंपनीने 124 cc सिंगल सिलेंडर इंजिन Suzuki Access 125 ला दिलं आहे, जे एयर कूल्ड आधारित आहे. हे इंजिन 8.7 पॉवर आणि 10 nm टॉर्क जनरेट करतं. याचं ट्रान्समिशन ऑटोमेटिक आहे. Suzuki Access 125 57.22 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देत असून हे मायलेज ARAI प्रमाणित असल्याचा दावा कंपनीने दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.