Home /News /auto-and-tech /

BS-IV वाहनांबद्दल सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, 31 मार्चनंतरच्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द!

BS-IV वाहनांबद्दल सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, 31 मार्चनंतरच्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द!

27 मार्च रोजी BS-IV वाहनांची विक्री करण्यासाठी कंपन्यांना 10 दिवसांची मुदत दिली होती.

    नवी दिल्ली, 08 जुलै : सुप्रीम कोर्ट (Supreme Court of India) ने  बीएस-IV (BSIV) वाहनांबद्दल एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.   27 मार्च 2020  सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे 31 मार्चनंतर विक्री झालेल्या  BS-IV वाहनांचे रजिस्ट्रेशन होणार नाही. कोर्टाच्या या निर्णयामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. लॉकडाउनच्या काळात वाहनांची विक्री न झाल्यामुळे BS-IV वाहनांच्या विक्री आणि रजिस्ट्रेशनसाठी परवानगी द्यावी अशी मागणी  फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर असोसिएशन (FADA) केली होती. आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने या संघटनेला फटकारून काढले आहे. देशात एका संख्येपर्यंत वाहन विक्रीसाठी परवानगी दिली होती. पण, कार आणि दुचाकी उत्पादन कंपन्यांनी याचा गैरफायदा घेतला. त्यामुळे कोर्टाने लॉकडाउनच्या काळात BS-IV वाहनांच्या विक्री आणि रजिस्ट्रेशनसाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 23 जुलैला होणार आहे. 31 मार्च नंतर विक्री झालेल्या BS- 4 गाड्यांचे रजिस्ट्रेशन होणार नाही. सुप्रीम कोर्टाने याबद्दल 27 मार्च एक निर्णय दिला होता. त्यामुळे 31 मार्चच्या आधी जर कुणी वाहन खरेदी केले असेल तरच त्याचे रजिस्ट्रेशन होणार आहे. जर डीलरने e vahan पोर्टलवर तुमच्या वाहन खरेदीची माहिती अपलोड केली नसेल तर हा ग्राहकांना मोठा धक्का असणार आहे. काय आहे प्रकरण? 27 मार्च रोजी BS-IV वाहनांची विक्री करण्यासाठी कंपन्यांना 10 दिवसांची मुदत दिली होती. लॉकडाउन लागू झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली होती.  सुप्रीम कोर्टाने वाहन उत्पादन कंपन्यांना 1,05,000 वाहनं विक्रीसाठी परवानगी दिली होती. पण वाहन उत्पादन कंपन्यांनी  10 दिवसाच्या आत जवळपास 2,55,000 वाहनांची विक्री केली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय मागे घेऊन कंपन्यांना दणका दिला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या