Home /News /auto-and-tech /

Nostalgic...35 वर्षांनतरही Super Mario गेमची जबरदस्त क्रेज; दीड कोटींमध्ये विकली गेली कॉपी

Nostalgic...35 वर्षांनतरही Super Mario गेमची जबरदस्त क्रेज; दीड कोटींमध्ये विकली गेली कॉपी

हा खेळ सन 1981 मध्ये सुरू झाला होता. 'डॉन्की कॉन्ग' या खेळाचे हे पात्र जपानचे डिझायनर शिगुरे मियामोटो यांनी डिझाइन केले होते.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : स्मार्टफोनच्या (Smartphone) युगात नवीन प्रकारचे आणि मनोरंजक व्हिडिओ गेम्स (Video Games) येत-जात असतात. परंतु गेम प्रेमी सर्वात लोकप्रिय गेम सुपर मारिओ विसरलेले नाहीत. 2017 मध्ये कंपनीने निनटेंडो (Nintendo) चा नवीन वर्जन सुपर मार्यियो ओडेसीची नवीन आवृत्ती बाजारात आणली जी सुपरहिट ठरली. यावरुन मारिओची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही याचा अंदाज काढला जाऊ शकतो. आता बातमी अशी आहे की गेल्या आठवड्यात सुपर मारिओ ब्रॉस -3 ची दुर्मिळ सीलबंद कॉपी दोन कोटींच्या घरात विकली गेली आहे. हेरिटेज ऑक्शनमध्ये गेमचा लिलाव झाला आहे. गेमच्या कॉपीच्या या विक्रीने वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे. गेम ठरला सुपरहिट 20 नोव्हेंबर रोजी सुपर मारिओ ब्रोस-3 च्या (Super Mario Bros-3) कॉपीचा 1,56,000 डॉलर्समध्ये लिलाव झाला. यापूर्वी, खेळाची शेवटची कॉपी 1,14,000 डॉलर्समध्ये लिलाव झाली होती. कंपनीने या प्रकरणात स्वत:चा जागतिक विक्रम मोडला आहे. अहवालानुसार, या खेळाची प्रत खरेदी करण्यासाठी 20 कंपन्यांनी लिलावात भाग घेतला. त्याच वेळी, हेरिटेज ऑक्शननुसार दुर्मिळ पॅकेजिंगमुळे कॉपीचे मूल्य खूप जास्त होते. अहवालानुसार व्हिंटेज व्हिडिओ गेम ग्रेडिंग कंपनी वाटा गेम्सने सुपर मारिओ ब्रॉस -3 च्या कॉपीला 9.2+ स्कोर दिला आहे. ज्याचा अर्थ गेम एकदम परफेक्ट आहे. त्याच वेळी, हेरिटेज ऑक्शन आणि व्हिडिओ गेम्सचे संचालक, वॅलेरी मेक्लिक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एकाच वर्षी झालेल्या दोन मोठ्या लिलावामुळे त्या खुश नाहीत. या वर्षी व्हिडीओ गेम कॉपीचा हा दुसरा लिलाव आहे. याआधी त्यांच्या खेळाची दुर्मिळ शिल्ड कॉपी विकून निनटेंडोने विश्वविक्रम केला होता. यावर्षी जुलैमध्ये या खेळाची जुनी दुर्मिळ कॉपी सुमारे 82 लाख रुपयांमध्ये लिलाव झाली. हा गेम 1985 साली रिलीज झाला होता. ही आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक कॉपी होती ज्यांचे रेकॉर्ड कंपनीच्या दुर्मिळ कॉपीने मोडले आहे. हे ही वाचा-Cadbury Chocolate : सेल्समनच्या 'या' भारी कल्पनेमुळे कंपनीची वाढली विश्वासार्हता त्याच वेळी, हेरिटेज ऑक्शन आणि व्हिडिओ गेम्सचे संचालक, वॅलेरी मेक्लिक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एकाच वर्षात दोन मोठ्या लिलावामुळे त्या खुश नाहीत. या वर्षी व्हिडिओ गेम कॉपीचा हा दुसरा लिलाव आहे. याआधी त्यांच्या खेळाची दुर्मिळ शिल्ड प्रत विकून विश्वविक्रम केला होता. यावर्षी जुलैमध्ये या खेळाची जुनी दुर्मिळ कॉपीचा सुमारे 82 लाख रुपयांमध्ये लिलाव झाला. ही 1985 साली रिलीज करण्यात आली होती. ही आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक कॉपी होती. ज्याचा रेकॉर्ड कंपनीच्या आणखी एक दुर्मिळ सील्ड कॉपीने मोडला आहे हा खेळ 1981 साली सुरू झाला होता यापूर्वी रेकॉर्ड ब्रेकिंग बोलीबद्दल गेम विशेषज्ज्ञ पत्रकार ख्रिस कोहलर यांनी लिहिले आहे की, 'या लिलावाने एकाच गेमच्या विक्रीचा नवीन विक्रम केला आहे, विशेष म्हणजे खेळाच्या नवीन आवृत्तीप्रमाणेच नवीन विक्रीनेही मागील विक्रम मोडले आहे. सुपर मारिओ ब्रॉस हे या खेळाचे मुख्य पात्र आहे. हा खेळ सन 1981 मध्ये सुरू झाला होता. 'डॉन्की कॉन्ग' या खेळाचे हे पात्र जपानचे डिझायनर शिगुरे मियामोटो यांनी डिझाइन केले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या