मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Electric Vehicle मालकांचं टेन्शन कमी होणार; BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार

Electric Vehicle मालकांचं टेन्शन कमी होणार; BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) पुढील पाच वर्षांत सुमारे 7000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) पुढील पाच वर्षांत सुमारे 7000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) पुढील पाच वर्षांत सुमारे 7000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे.

मुंबई, 5 नोव्हेंबर : इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicle) भारताचं भविष्य आहे. आतापासून इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना सध्यातरी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे चार्जिंग स्टेशन्स (EV Charging Stations) उपलब्धता. मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली गेली तर इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही झपाट्याने वाढेल. आता नागरिकांची ही अडचण ओळखून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) पुढील पाच वर्षांत सुमारे 7000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे.

अलीकडेच, देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच Indian Oil Corporation ने सांगितले होते की कंपनी पुढील तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांसाठी 10,000 चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे.

Car चं Steering फेल झाल्याचं कसं समजेल? या 5 संकेतांमुळे आधीच मिळेल माहिती

उल्लेखनीय बाब म्हणजे, COP-26 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतासाठी 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य जाहीर केले आहे. भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे.

BPCL चे देशभरात सुमारे 19,000 रिटेल आउटलेट

देशातील दुसरी सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी बीपीसीएलचे मोठं डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आहे. ज्यामध्ये देशभरातील सुमारे 19,000 रिटेल आउटलेटचा समावेश आहे. ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नवीन व्यवसाय संधी देईल तसेच ऑटो इंधनाची आवश्यकता कमी झाल्यास उद्भवणाऱ्या जोखमीपासून बचाव करेल, असं कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.

सर्वाधिक रेडिएशन निघणारे Smartphone, या लिस्टमध्ये तुमचा फोन तर नाही ना?

नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत आणि लोकही त्यात रस घेत आहेत. अशा परिस्थितीत, येत्या काही वर्षांत, देशातील इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टममध्ये वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे, असं कंपनीने म्हटलं.

First published:
top videos

    Tags: Auto expo, Electric vehicles