लवकरच PUBG मोबाइल इंडिया होणार लाईव्ह; जुन्या युजर्सच्या आयडीबाबत आली GOOD NEWS!

लवकरच PUBG मोबाइल इंडिया होणार लाईव्ह; जुन्या युजर्सच्या आयडीबाबत आली GOOD NEWS!

भारतातील गेमर्ससाठी PUBG मोबाईल गेमचं नवीन व्हर्जन PUBG मोबाईल इंडिया घेऊन येणार आहे, तेव्हापासून हा गेम नक्की कसा आहे याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : भारतातील गेमर्ससाठी PUBG मोबाईल गेमचं नवीन व्हर्जन PUBG मोबाईल इंडिया घेऊन येणार आहे, तेव्हापासून हा गेम नक्की कसा आहे याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे चाहत्यांच्याही अपेक्षा वाढत आहेत. सध्या तरी PUBG मोबाईल इंडिया गेम कधी सुरू होणार याबाबत आम्हाला जास्त माहिती नाही, परंतु आता असं कळतंय की तुम्ही PUBG मोबाईलवर बंदी येण्यापूर्वी वापरलेले युझर आयडी तुम्हाला नव्या PUBG मोबाईल इंडिया गेममध्येही वापरले जाऊ शकतात. याचा अर्थ असा की जेव्हा आपण PUBG मोबाईल इंडिया खेळायला सुरु कराल तेव्हा वेगळा आयडी तयार करण्याची गरज नाही आणि आपण सर्व जेतीपदं, रिवॉर्ड्स, स्किन्स आणि बरंच काही पुन्हा मिळवू शकता.

PUBG कॉर्पोरेशन आणि पॅरेंट कंपनी KRAFTON मोबाईल गेम डेटा होस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अझूर क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीशी बोलणी करत आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये जेव्हा PUBG ने गेमच्या एक्सबॉक्स व्हर्जनसाठी अमेझॉन वेब सर्व्हिसेस वरून मायक्रोसॉफ्ट अझूरची सेवा सुरू केली होती, आता अशी अपेक्षा आहे की गेमच्या सर्व मोबाईल, पीसी आणि कन्सोल व्हर्जन्ससाठी जर ते आधीपासून वापरत नसतील, तर आता अझूरचा वापर करतील. वेबसाइट इनसाइडर स्पोर्ट्सने असेही म्हटले आहे की ज्या गेमर आयडींवर बंदी आली आहे ते आता वापरता येणार नाहीत.

हे ही वाचा-Aadhaar संदर्भात आहे कोणतीही समस्या?हा क्रमांक डायल केल्यानंतर मिळेल सर्व माहिती

या महिन्याच्या सुरुवातीला, PUBG कॉर्पोरेशनने जाहीर केले की PUBG मोबाईल इंडिया नावाचा एक नवीन गेम आणणार आहे. ते म्हणतात की या खेळाच्या विविध बाबी भारतासाठी मुख्यतः तयार केल्या गेल्या आहेत. “गेम मध्ये वर्चुअल सिम्युलेशन ट्रेनिंग ग्राऊंड्सवर सेट केले जाणार आहे, नवीन पात्रे व त्यांना मिळणारी ऑटोमॅटिक वस्त्रं आणि खेळाच्या वर्चुअल स्वरूपाचे प्रतिबिंब दर्शविण्यासाठी ग्रीन हिट इफेक्ट यासारख्या खेळाच्या विविध बाबी भारतीय गेमर्ससाठी अड केल्या जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कंपनीमध्ये असे फीचर्स अड केले आहेत जे युवा खेळाडूंसाठी आरोग्यासाठी व चांगल्या गेमप्लेच्या सवयींना प्रोत्साहित करण्यासाठी खेळाच्या वेळेवर निर्बंध लादतील,” असे एका डेव्हलपरने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

PUBG कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी KRAFTON व्हिडीओ गेम्स, एस्पोर्ट्स तसेच एंटरटेनमेंट व आयटी उद्योगांना चालना देण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक भारतात करणार आहे. तसेच, PUBG मोबाईल इंडिया गेम नवीन भारतीय उपकंपनी अंतर्गत असेल. सध्या, आम्हाला माहित नाही की PUBG मोबाईल इंडिया गेम प्रत्यक्षात कधी रिलीज होईल. डेव्हलपर्सनी यावेळी सांगितले की हा गेम 'लवकरच' येत आहे. PUBG कॉर्पोरेशन किंवा त्याच्या भारतीय सहाय्यक कंपनीला भारत सरकारकडून आवश्यक मंजूरी आणि परवानग्या मिळाल्या आहेत की नाही याबद्दल अजूनही काहीच स्पष्ट झाले नाही आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 19, 2020, 11:14 PM IST
Tags: pubg game

ताज्या बातम्या