मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Instagram वर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तुम्हीही नाही केली ना ही चूक? पासवर्ड झाले लीक

Instagram वर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तुम्हीही नाही केली ना ही चूक? पासवर्ड झाले लीक

इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही विविध प्रयत्न करत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या ‘सोशल कॅप्टन’ या ऑनलाईन सर्विसने हजारो यूजर्सचा डेटा हॅकर्ससाठी लीक केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 31 जानेवारी : इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही विविध प्रयत्न करत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या ‘सोशल कॅप्टन’ या ऑनलाईन सर्विसने हजारो यूजर्सचा डेटा हॅकर्ससाठी लीक केला आहे.

अमेरिकेतील टेक्नॉलॉजीसंदर्भात माहिती देणाऱ्या वेबसाईटच्या अहवालानुसार, सोशल कॅप्टनने हजारो इन्स्टाग्राम यूजर्सचे पासवर्ड असुरक्षित प्लेनटेक्स्टच्या माध्यमातून आपल्याकडे साठवून ठेवले होते. त्यामुळे सोशल कॅप्टन वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला इतर व्यक्तीचं अकाउंट लॉग-इन केल्याशिवाय अ‍ॅक्सेस करता येऊ शकत होतं. यामुळे सुमारे 10 हजार यूजर्सचा डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचला आहे आणि हे अत्यंत गंभीर आहे. यामध्ये 70 अकाउंट्स असे आहेत ज्यांनी सोशल कॅप्टनची प्रीमियम सेवा घेतली आहे.

सोशल कॅप्टनने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ही समस्या दूर केली आहे. मात्र अशाप्रकारे आपली वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या हातात पडणं अत्यंत धोकादायक आहे. सोशल कॅप्टनकडून झालेल्या या चुकीची दखल इन्स्टाग्रामकडूनही घेण्यात आली आहे. याबाबत इन्स्टाग्रामने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल कॅप्टनने नियम व अटींचं उल्लंघन केलं आहे आणि तपास करून कंपनीवर योग्य कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण इन्स्टाग्रामकडून देण्यात आलं आहे.

याआधी 2019 मध्ये स्वत: इन्स्टाग्राम यूजर्सचा डेटा लीक करण्याच्या प्रकरणात अडकलं होतं. मे 2019 मध्ये झालेल्या या प्रकरणात जगभरातील काही नामांकित व्यक्तींचा वैयक्तिक डेटा लीक झाला होता. मुंबईतील सोशल मीडिया मार्केटिंग फर्मशी याची पाळमुळं होती. 2017मध्ये देखील इन्स्टाग्रामवरील बगमुळे 6 कोटी सेलिब्रिटींचा डेटा लीक झाला होता. यामध्ये टेलर स्विफ्ट, किम करदर्शीयन यांसारख्या जगप्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश होता.

First published:

Tags: Data leak, Instagram