मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Skoda भारतात लॉन्च करणार तीन नव्या कार, फिचर्स पाहून व्हाल हैराण!

Skoda भारतात लॉन्च करणार तीन नव्या कार, फिचर्स पाहून व्हाल हैराण!

गेल्या काही वर्षांत कारचं मार्केट (Car Market) वेगानं विस्तारत आहे. याच पार्श्वभूमीवर स्कोडा कंपनी (Skoda Company) भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या काही वर्षांत कारचं मार्केट (Car Market) वेगानं विस्तारत आहे. याच पार्श्वभूमीवर स्कोडा कंपनी (Skoda Company) भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या काही वर्षांत कारचं मार्केट (Car Market) वेगानं विस्तारत आहे. याच पार्श्वभूमीवर स्कोडा कंपनी (Skoda Company) भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

मुंबई, 11 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांत कारचं मार्केट (Car Market) वेगानं विस्तारत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या, नावीन्यपूर्ण फीचर्स असलेल्या कार्स, एसयूव्ही उपलब्ध आहेत. इंधनाचे दर सातत्यानं वाढत असल्याने अनेक जण इलेक्ट्रिक कार (Electric Car) खरेदीकडे वळत आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जवळपास सर्वच कार कंपन्या इलेक्ट्रिक कार्सची नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्कोडा कंपनी (Skoda Company) भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी ही कार एंट्री लेव्हल ईव्ही (Entry Level EV) स्वरूपात लॉन्च करू शकते. परंतु याबाबत कंपनीनं अद्याप कोणत्याही स्वरूपाची अधिकृत माहिती दिलेली नाही. याशिवाय स्कोडा कंपनी लवकरच आणखी दोन कार मॉडेल्स (Car Models) लॉन्च करणार आहे. यात एका एसयूव्ही कारचा (SUV Car) समावेश आहे. या तिन्ही कारची खास वैशिष्ट्यं जाणून घेऊ या. स्कोडा कंपनी भारतात लवकरच एका नव्या इलेक्ट्रिक कारसह दोन नव्या कार्स लॉंच करणार आहे. भारतासाठी नवीन सब-4 मीटर एसयूव्ही सादर करत असल्याच्या वृत्ताला स्कोडा इंडियाने नुकताच दुजोरा दिला आहे. या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीची रचना MQB AO In या दमदार प्लॅटफॉर्मवर केली जाईल. हे मॉडेल जागतिक बाजारात निर्यात केलं जाणार आहे. फोक्सवॅगन ग्रुपच्या इंडिया 2.5 योजनेअंतर्गत विकसित केलं जाणारं हे पहिलं प्रॉडक्शन मॉडेल असेल. या नवीन स्कोडा कॉम्पॅक्ट एसयूव्हीचं (Skoda Compact SUV) उत्पादन जानेवारी 2025 पर्यंत सुरू होईल, असं सांगितलं जात आहे. स्कोडा कंपनी भारतीय बाजारासाठी सध्या एक एंट्री लेव्हल कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. फोक्सवॅगन आयडी लाइफ संकल्पनेत यापूर्वीच वापरल्या गेलेल्या नवीन एमईबी (MEB) इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित ही इलेक्ट्रिक सिटी कार असेल. डिझाइनविषयी बोलायचं झालं तर खर्चाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली आहे. स्कोडा कंपनीने या इलेक्ट्रिक कारबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. कंपनी लवकरच स्कोडा कुशाक माँटे कार्लो ( Skoda Kushaq Monte Carlo) हे मॉडेलही लॉन्च करणार आहे. मॉडेलला स्पोर्टी लूक देण्यासाठी कंपनीनं लाल आणि काळ्या रंगात ही कार डिझाइन केली आहे. ओल्ड जनरेशन ओक्टाव्हिया आर एस 245 प्रमाणे (Octavia RS 245) स्कोडा कुशाक मॉंटे कार्लो एडिशनमध्ये 205/55 सेक्शन टायर्ससह नवीन 17 इंच अ‍ॅलॉय व्हील्स आहेत. यात 1.0 लीटर TSI आणि 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह ऑटोमॅटिक गिअर बॉक्स असेल.
First published:

पुढील बातम्या