Home /News /auto-and-tech /

इलेक्ट्रिक स्कूटर घ्यावी की पेट्रोलवरची बाईक? जाणून घ्या दोन्ही गाड्यांचे फायदे-तोटे!

इलेक्ट्रिक स्कूटर घ्यावी की पेट्रोलवरची बाईक? जाणून घ्या दोन्ही गाड्यांचे फायदे-तोटे!

दोन्हीपैकी कोणत्या स्कूटरची खरेदी करणं फायद्याचं ठरेल, याबाबत अनेक जण संभ्रमात असतात

    मुंबई, 17 जानेवारी : सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) चर्चा होत आहे. सरकारही ( government) त्याला प्रोत्साहन देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. याचा पर्यावरणाला फायदा ( benefit the environment) होत असतानाच, पेट्रोल आणि डिझेलवर आपल्याला अवलंबून ( dependence) राहावं लागणार नाही; पण इलेक्ट्रिक स्कूटर ( electric scooter) खरेदी करावी की पेट्रोल स्कूटर ( petrol scooter) असा प्रश्न अनेकांना पडतो. दोन्हीपैकी कोणत्या स्कूटरची खरेदी करणं फायद्याचं ठरेल, याबाबत अनेक जण संभ्रमात असतात. हा संभ्रम दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या दोन्ही गाड्यांचे फायदे आणि तोटे ( advantages and disadvantages) काय आहेत, ते सांगणार आहोत. किंमत इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा पेट्रोल स्कूटर स्वस्त आहेत. पेट्रोल स्कूटरच्या किमतीच्या तुलनेत चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूपच जास्त आहे. आता स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सही बाजारात विक्रीसाठी येत असल्या तरी अनेक ग्राहक त्यांच्या किमतीवर समाधानी नसतात. रनिंग कॉस्ट पेट्रोल स्कूटरची रनिंग कॉस्ट जास्त आहे. पेट्रोलचे दरही खूप वेगाने गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे, इलेक्ट्रिक स्कूटरची रनिंग कॉस्ट खूपच कमी आहे. साध्या इलेक्ट्रिक स्कूटरची रनिंग कॉस्ट सुमारे 50 पैसे प्रति किलोमीटर आहे. मेंटेनन्स खर्च देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पेट्रोल स्कूटर खराब झाली, तर ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला मेकॅनिक सहज सापडतात. इलेक्ट्रिक स्कूटर खराब झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी त्याचे मेकॅनिक सहज सापडणार नाहीत. पेट्रोल स्कूटरचं सर्व्हिसिंग वेळोवेळी करावी लागतं. त्याचा खर्च खूप जास्त होतो. इलेक्ट्रिक स्कूटरचा सर्व्हिसिंग खर्च तुलनेने खूप कमी असतो. इंधन आणि चार्जिंग पेट्रोल स्कूटरसाठी इंधन सर्वत्र सहज उपलब्ध आहे. कोणत्याही शहरातल्या कोणत्याही पेट्रोल पंपावरून त्यात इंधन भरता येतं. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी अद्याप जास्त ठिकाणी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं गेलेलं नाही. हादेखील इलेक्ट्रिक स्कूटरचा सर्वांत मोठा तोटा आहे. प्रवास तुम्ही पेट्रोल स्कूटरने लांबचा प्रवास सहज करू शकता; मात्र इलेक्ट्रिक स्कूटरने लांबचा प्रवास करू शकत नाही. कारण ती डिस्चार्ज झाल्यावर अन्य कुठेही चार्ज करता येत नाही. इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यातच पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोलची स्कूटर विकून इलेक्ट्रिक स्कूटर घ्यावी का, असा विचारही अनेकांच्या मनात येतो. या दोन्हींपैकी कोणती स्कूटर वापरावी, यामध्ये संभ्रम असतो. इलेक्ट्रिक स्कूटर व पेट्रोल स्कूटर या दोन्हींचे फायदे व तोटे समजून घेतल्यास कोणती स्कूटर वापरली पाहिजे, याबाबतचा निर्णय घेण्यास मदत होईल.
    First published:

    पुढील बातम्या