• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • Tata PUNCH च्या खरेदीवर SBI ची जबरदस्त ऑफर, स्वस्त दरात मिळेल Car Loan; असं करा अप्लाय

Tata PUNCH च्या खरेदीवर SBI ची जबरदस्त ऑफर, स्वस्त दरात मिळेल Car Loan; असं करा अप्लाय

टाटा मोटर्सने (Tata Motors) लॉन्च केलेल्या Tata PUNCH या कारवर आता स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) एक धमाकेदार ऑफर (SBIs great offer on Tata PUNCH purchase) जारी केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : टाटा मोटर्सने (Tata Motors) लॉन्च केलेल्या Tata PUNCH या कारवर आता स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) एक धमाकेदार ऑफर (SBIs great offer on Tata PUNCH purchase) जारी केली आहे. यात ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज मिळणार असून त्यासाठीची प्रोसेसिंग फी ही माफ करण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना YONO SBI च्या App वरून अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर या लोनला अप्रूवल मिळेल. व्याजदरात मिळणार 0.50 टक्क्यांची सूट Tata PUNCH या कारची बुकिंग SBI च्या योनो या App वरून केल्यास ग्राहकांना 0.50 टक्क्यांची सूट मिळणार आहे. त्यामुळं टाटा (tata punch car price) कंपनीची ही आलिशान कार घेण्याची ही ग्राहकांना चांगली संधी आहे. या कारची एक्सशोरूम किंमत 5.49 लाख रूपये एवढी ठेवण्यात आली आहे.

  तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

  कोण करू शकतं Apply? या ऑफरसाठी कोणताही भारतीय  नागरिक अर्ज करू शकतो. त्यासाठी अर्जदाराचं वयोमर्यादा ही 21 ते 67 असायला हवी. त्याचबरोबर ग्राहकांना वार्षिक 3 लाख रूपयांचे उत्त्पन्न असायला हवं.

  नव्या Smartphone मध्ये असा ट्रान्सफर करा WhatsApp Data, पाहा सोपी पद्धत

  या कागदपत्रांची आहे आवश्यकता -मागील 6 महिन्याच्या बँक अकाउंटच्या डिटेल्स -आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र -लाइटबिल किंवा पाणीपट्टी भरल्याची पावती -2 पासपोर्ट साइज फोटो

  तुमचं WhatsApp इतर कोणी वापरतंय का? सोप्या ट्रिकने असं तपासा

  या कागदपत्रांबरोबर आता सॅलरीड नोकरदारांसाठी सॅलरी स्लिप, फॉर्म 16 आणि मागील 2 वर्षांचं आयटीआर सर्टिफिकेट देणं गरजेचं असणार आहे. तर नॉन सॅलरीड ग्राहकांसाठी ऑडिटेड बॅलन्स शीट, पी अॅन्ड एल स्टेटमेंट आणि सेल्स टॅक्स सर्टिफिकेट असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: