मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /SBI Alert! स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्या महत्त्वाच्या सेवा दोन दिवस राहणार बंद!

SBI Alert! स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्या महत्त्वाच्या सेवा दोन दिवस राहणार बंद!

State Bank Of India : आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळणार ३५ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या डिटेल्स

State Bank Of India : आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळणार ३५ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या डिटेल्स

ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार बँकिंगशी संबंधित कामं तातडीनं पूर्ण करावीत, असं आवाहन बॅंकेनं ट्विटव्दारे केलं आहे. बॅंकेने ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर : देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियानं (SBI) तिच्या 44 कोटी खातेधारकांसाठी (Account Holders) नुकतीच एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार बँकिंगशी संबंधित कामं तातडीनं पूर्ण करावीत, असं आवाहन बॅंकेनं ट्विटव्दारे केलं आहे. बॅंकेने ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली असून, त्यानुसार, बॅंकेच्या काही महत्त्वाच्या सेवा (SBI Services) उद्या (11 डिसेंबर 21) बंद राहणार आहेत. एसबीआय इंटरनेट बॅंकिंग सेवा शनिवारी-रविवारी रात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध नसेल म्हणजेच बंद असेल. त्यामुळे ग्राहकांनी 11 डिसेंबरच्या मध्यरात्री पूर्वी बॅंकेशी निगडीत ऑनलाइन कामं पूर्ण करावीत, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

    देशभरात `एसबीआय`चं मोठं नेटवर्क आहे. या माध्यमातून ग्राहकांना बॅंकिंगशी संबंधित विविध सेवा पुरवल्या जातात. या बॅंकेच्या ऑनलाइन सुविधांचा (Online Services) वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे एसबीआय सातत्यानं वेगवेगळ्या घडामोडी, महत्त्वाची तसेच जगजागृतीपर माहिती ग्राहकांना ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून देत असते. ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, या विषयीचं मार्गदर्शन देखील एसबीआय ट्विटरच्या माध्यमातून ग्राहकांना करत असते. एसबीआय आता तंत्रज्ञान अपग्रेडेशन करत असल्यानं शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ग्राहकांना ऑनलाइन सेवेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे बँकिंगशी संबंधित कामं ग्राहकांनी तातडीनं पूर्ण करावीत, अशी सूचना एसबीआयनं ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

    हे ही वाचा-WhatsApp ची मोठी घोषणा; आता युजरला क्रिप्टोकरन्सीमध्येही करता येणार व्यवहार

    बॅंकेने ट्विट करून दिली माहिती

    एसबीआयने अधिकृत ट्विटर हॅंडलवर ट्विट केलं आहे की ``आम्ही आमच्या ग्राहकांना एक उत्कृष्ट बॅंकिंग सेवा प्रदान करतो, त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत कायम रहावं. आम्ही 11 डिसेंबर 2021 रोजी रात्री 11.30 ते 12 डिसेंबर 2021 च्या पहाटे 4.30 वाजेदरम्यान ( 300 मिनिटं) तंत्रज्ञान अपग्रेडेशनचं काम करणार आहोत. एसबीआयच्या ऑनलाइन बँकिंग सेवांमध्ये INB, Yono, Yono Lite, Yono Business आणि UPI चा समावेश आहे. या सुविधा या कालावधीत बंद राहतील. त्यामुळे ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत``.

    एसबीआयच्या इंटरनेट बॅंकिंग सेवेचा (Internet Banking) वापर सुमारे 8 कोटींपेक्षा अधिक तर मोबाईल बॅंकिंग (Mobile Banking) सेवेचा वापर सुमारे 2 कोटी लोक करतात. तसेच Yono वर नोंदणीकृत ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे. यावर दररोज सुमारे 90 लाख लोक लॉग इन (Login) करतात. देशभरात एसबीआयच्या 22,000 हून अधिक शाखा आहेत. तसेच 57,889 पेक्षा अधिक एटीएमचं (ATM) मोठं नेटवर्क आहे.

    First published:

    Tags: SBI, बँक