हा 10 वर्षांचा मुलगा महिन्याला कमावतो 18 कोटी रुपये, जाणून घ्या कसे

अवघ्या 10 वर्षांचा हा मुलगा महिन्याला किमान 18 कोटी रुपये मिळवत असून, काही काळापूर्वी त्यानं डिजिटल क्षेत्रात पदार्पण करून अब्जावधी रुपये कमावले आहेत. या मुलाचे नाव आहे रायन काजी(Ryan Kaji).

अवघ्या 10 वर्षांचा हा मुलगा महिन्याला किमान 18 कोटी रुपये मिळवत असून, काही काळापूर्वी त्यानं डिजिटल क्षेत्रात पदार्पण करून अब्जावधी रुपये कमावले आहेत. या मुलाचे नाव आहे रायन काजी(Ryan Kaji).

  • Share this:
मुंबई, 9 एप्रिल : आजकाल अगदी लहान मुलंदेखील मोबाइल अगदी सहजपणे हाताळताना आपण पाहतो. आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अनेक उपकरणं ही मुलं अगदी सहज वापरतात. आजच्या युगात पूर्वीची अनेक क्षेत्र मागं पडली असून अनेक मुलं डिजिटल क्षेत्रातच आपलं करिअर करत आहेत. अशाच एका मुलानं सध्या सगळ्यांना थक्क केलं आहे. अवघ्या 10 वर्षांचा हा मुलगा महिन्याला किमान 18 कोटी रुपये मिळवत असून, काही काळापूर्वी त्यानं डिजिटल क्षेत्रात पदार्पण करून अब्जावधी रुपये कमावले आहेत. या मुलाचे नाव आहे रायन काजी(Ryan Kaji). अमेरिकेतील (USA) टेक्सासमध्ये (Texas) राहणाऱ्या रायन काजी यानं 2015 मध्ये आपल्या यू ट्यूब (You Tube) करिअरची सुरुवात केली होती. त्यानं यू ट्यूबवर खेळण्यांचे रिव्ह्यू व्हिडिओ (Toy Review Video) पहायला सुरुवात केली होती. ते बघत असताना तो आपल्या आईला म्हणाला, सगळी मुलं यू ट्यूबवर आहेत तर मी इथं काय करतोय? आणि इथूनच त्याच्या डिजिटल करिअरला सुरुवात झाली. रायनही आपल्या पद्धतीनं खेळण्यांचे रिव्ह्यू व्हिडिओ तयार करू लागला. त्याचे व्हिडिओ सर्वांना आवडायला लागले. त्याच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली. तीन वर्षात रायनची लोकप्रियता इतकी वाढली की, 2018, 2019 आणि 2020 या तिन्ही वर्षात यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करणारा तो एकमेव यूट्यूबर (You Tuber) होता. रायनला गेल्या वर्षी यूट्यूबकडून 29.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 221 कोटींची म्हणजेच महिन्याला साधारण 18 कोटींची कमाई झाली आहे. याशिवाय वर्ल्ड ब्रँडेड टॉय अँड क्लोदिंग यांच्या माध्यमातून त्यानं 200 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलबरोबरच रायन कपडे आणि खेळण्यांशी निगडीत अनेक डील्सही करत आहे. रायनचे खरे आडनाव गुआन आहे पण त्याची ऑनलाइन लोकप्रियता बघून त्याच्या कुटुंबानं त्याचं आडनाव काजी ठेवलं आहे. रायनचा परिवार 9 यूट्यूब चॅनेल्स चालवतो. त्यापैकी रायन वर्ल्ड हे चॅनेल सर्वांत लोकप्रिय आहे. याचे 4 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. रायन काजी आता स्वतःच एक ब्रँड झाला आहे. त्यानं निकलोडीएनबरोबर एका टीव्ही सिरीयलसाठी करार केला असून त्यासाठी त्याला कित्येक मिलीयन डॉलर्स मिळणार आहेत. जगभरातील असंख्य मुलं रायनचे व्हिडिओ बघतात. लाखो, कोट्यावधी व्ह्यूज त्याच्या व्हिडिओजना असतात. रायनचा सार्वाधिक लोकप्रिय झालेला व्हिडिओ आतापर्यंत 2 बिलियनपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. यूट्यूबच्या इतिहासातील सर्वाधिक बघितल्या गेलेल्या 50 टॉप व्हिडिओमध्ये या व्हिडिओचा समावेश आहे. रायनला त्याच्या घरच्यांचा पूर्ण पाठींबा असून, आता तो चाईल्ड एनफ्ल्यूएन्झर (Child Influencer) म्हणून प्रस्थापित झाला आहे. इन्स्टाग्राम एनफ्ल्यूएन्झरनंतर आता सोशल मीडियावर चाईल्ड एमफ्ल्यूएन्झर लोकप्रिय झाले आहेत.
First published: