मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /काय सांगता! फक्त 12 हजार रुपयांत मिळणार रॉयल एनफिल्ड बाईक! कंपनीनं आणली जबरदस्त ऑफर

काय सांगता! फक्त 12 हजार रुपयांत मिळणार रॉयल एनफिल्ड बाईक! कंपनीनं आणली जबरदस्त ऑफर

काय सांगता! फक्त 12 हजार रुपयांत मिळणार रॉयल एनफिल्ड बाईक! कंपनीनं आणली जबरदस्त ऑफर

काय सांगता! फक्त 12 हजार रुपयांत मिळणार रॉयल एनफिल्ड बाईक! कंपनीनं आणली जबरदस्त ऑफर

रॉयल एनफिल्डनं बाईक खरेदी करणाऱ्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर देऊ केल्या आहेत. कंपनीनं बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी आवश्यक असलेली डाउन पेमेंटची रक्कम कमी केली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 15 नोव्हेंबर: रॉयल एनफिल्ड बाईक्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. या बाईक्स तरुणांमध्ये स्टेटस सिम्बॉल मानल्या जातात. त्यामुळे अनेकांना रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याची इच्छा आहे. पण, जास्त किंमतीमुळे ते ही बाईक खरेदी करू शकत नाहीत. ज्यांना ही बाईक विकत घ्यायची आहे मात्र, मोठं डाउन पेमेंट करणं परवडत नाही, अशांसाठी एक चांगली बातमी आली आहे.

  रॉयल एनफिल्डनं बाईक खरेदी करणाऱ्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर देऊ केल्या आहेत. कंपनीनं बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी आवश्यक असलेली डाउन पेमेंटची रक्कम कमी केली आहे. रॉयल एनफिल्डच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, लोकप्रिय क्रूझर बाईक Royal Enfield Meteor 350 साठी आता फक्त 12 हजार रुपये डाउन पेमेंट करावं लागणार आहे. म्हणजेच 12 हजार रुपये भरून ग्राहक ही गाडी आपल्या घरी नेऊ शकतात. या बाईकच्या सर्वांत साध्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 2.01 लाख रुपये इतकी आहे.

  बाईकची तीन मॉडेल उपलब्ध

  Royal Enfield Meteor 350 ही बाईक भारतात तीन प्रकारांमध्ये आणि सात रंगांमध्ये उपलब्ध आहे. टॉप व्हेरियंटची किंमत दोन लाख 17 हजार 791 रुपयांपासून सुरू होते. या बाईकमध्ये 349 सीसी बीएस 6 इंजिन आहे. ज्यामधून 20.2 बीएचपी पॉवर आणि 27 एनएस टॉर्क निर्माण होतो. Royal Enfield Meteor 350 मध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूला डिस्क ब्रेकसह अँटिलॉकिंग ब्रेकिंग सिस्टम आहे. बाईकचं वजन 191 किलो ग्रॅम असून, 15 लिटर कमाल क्षमतेची इंधन टाकी आहे.

  J प्लॅटफॉर्मवर बनलेली पहिली बाईक

  Meteor 350 ही गाडी कंपनीच्या नवीन J प्लॅटफॉर्मवर डिझाइन केलेली पहिली बाईक आहे. या बाइकने लोकप्रिय 'थंडर बर्ड'ची जागा घेतली असून, आतापर्यंत नवीन खरेदीदारांना आकर्षित करण्यात यश मिळवलं आहे. Meteor 350 पिवळा, लाल, निळा, स्टेलर लाल, काळा आणि तपकिरी या सात रंगांमध्ये उपलब्ध आहे. आधुनिक क्रूझरसारखी बाईक दिसावी म्हणून एनफिल्डनं या बाईकच्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले आहे. तसंच बाईकचा आकर्षकपणा वाढवण्यासाठी अनेक अॅक्सेसरीजचा वापर केला आहे.

   

  ही बाईक शहरामध्ये 40 किलोमीटर मायलेज देते. महामार्गावर, हा आकडा प्रति लिटर सुमारे 35 किलोमीटर इतका आहे. बाईकमध्ये मॉडर्न सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. ज्यामध्ये नेव्हिगेशन आणि ब्लूटूथसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. ड्युअल चॅनल-एबीएस स्टँडर्ड आणि एलईडी डीआरएलदेखील या बाईकमध्ये आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Bike