Home /News /auto-and-tech /

रेनॉल्ट इंडिया या व्यक्तींना देत आहे खास डिस्काऊंट, जीएसटीमध्येही सवलत

रेनॉल्ट इंडिया या व्यक्तींना देत आहे खास डिस्काऊंट, जीएसटीमध्येही सवलत

रेनॉल्ट इंडिया (Renault India) ही कार बनवणाऱ्या कंपनी जीएसटी (GST)मध्ये डिस्काऊंट देत आहे, सोबतच कार खरेदी करताना अधिकच्या सवलती देण्याची ऑफरही कंपनीने दिली आहे.

    मुंबई : रेनॉल्ट इंडिया (Renault India) या कार बनवणाऱ्या कंपनीने दिव्यांगांना कार खरेदीवर जीएसटी (GST) दरात सवलत दिली आहे. अर्थमंत्रालयाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना गाडी खरेदीमध्ये 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. याशिवाय कंपनीने विशेष सवलतीही जाहीर केल्या आहेत. अर्थ मंत्रालय (Finance Ministry) आणि अवजड उद्योग मंत्रालयानं (Heavy Industries Ministry) दिलेल्या सूचनांनुसार कंपनीने ही खास सवलत योजना जाहीर केली आहे. कंपनीच्या देशभरातील सर्व डीलरशिप्समध्ये या सवलती मिळणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी कंपनीने जीएसटी सवलतीसह विशेष कॉर्पोरेट डिस्काउंटही जाहीर केला आहे. आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर ग्राहकांना या सर्व सवलती मिळणार आहेत. सर्व प्रकारच्या कारवर कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळणार आहे. मात्र जीएसटी सवलत 1200 सीसीपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन असलेल्या आणि सब फोर मीटर्सच्या पेट्रोल कारवरच मिळणार आहे. या सवलत योजनेबाबत बोलताना रेनॉल्ट इंडियाचे सेल्स अँड नेटवर्क हेड सुधीर मल्होत्रा म्हणाले, ‘आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींचे मोठे योगदान असते. रोजच्या जीवनातही ते जे धैर्य दाखवतात ते विशेष असते. त्यांची सकारात्मकता आणि दृष्टिकोन यांची दखल घेऊन त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांना जीएसटी दरासह अन्य सवलती देत आहोत. ज्यामुळे त्यांना आमच्या कार खरेदी करणं सोपं व्हावं. केंद्र सरकारनं अशा व्यक्तींचे आयुष्य सुकर व्हावे याची जबाबदारी घेतली आहे, यात आमचाही सहभाग असावा या उद्देशाने आम्ही हा पुढाकार घेतला आहे.’ ग्राहकांना रेनॉल्ट डस्टर (Duster) कारवर कमाल 30 हजार रुपये सवलत मिळणार आहे, तर क्विड (Kwid) आणि ट्रायबर (Triber) या कारवर रोख 9 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्याशिवाय या महिन्यात कार खरेदी केल्यास या सवलतींसह अन्य आकर्षक सवलतींचाही फायदा मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना रेनॉल्टची आवडती कार सवलतीच्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. रेनॉच्या डस्टर, क्विड आणि ट्रायबर या तीन कार वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत. तीन लाखांपासून ते 14 लाखांपर्यंत किंमतीच्या या कार आहेत. क्विड आणि ट्रायबर या कारचा समावेश सब फोर मीटर प्रकारात होतो. क्विडची किंमत साधारण तीन लाखांपासून आहे, तर ट्रायबरची किंमत 5 लाखांपासून पुढे आहे. रेनॉल्ट डस्टर साधारण 9 लाखांपासून पुढे उपलब्ध आहे. सध्या वाहन कंपन्या वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती जाहीर करत आहेत. अशा कंपन्यांच्या यादीत आता रेनॉल्टचाही समावेश झाला आहे. Ford India कडून या गाड्यांवर मिळत आहे 5 लाखांपर्यंतचा डिस्काऊंट
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या