Home /News /auto-and-tech /

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणारी रिफर्बिश्ड गॅजेट्स खरेदी करावीत का?

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणारी रिफर्बिश्ड गॅजेट्स खरेदी करावीत का?

रिफर्बिश्ड गॅजेट्स (Refurbished Gadgets) कमी किमतीत उपलब्ध असतात आणि त्यावर पुन्हा मोठा डिस्काउंटही दिला जातो. रिफर्बिश्ड म्हणजे काय, या उत्पादनांवर जास्त डिस्काउंट का दिला जातो असा प्रश्न तुमच्या मनात नक्की निर्माण झाला असेल.

    मुंबई, 25 जून : सध्याच्या काळात ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या (E-Commerce Websites) माध्यमातून ऑनलाईन खरेदीचं (Online Shopping) प्रमाण वाढलं आहे. रोजच्या गरजेच्या सर्वच वस्तू घरबसल्या उपलब्ध होत असल्याने बहुतांश जण ऑनलाईन खरेदीस पसंती देत आहेत. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक ई-कॉमर्स वेबसाईट्स उत्पादनांवर भरघोस सूट, ऑफर्स (Offers) देत आहेत. अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर आयफोन आणि अन्य प्रीमियम फोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. किंमत कमी असल्याने ग्राहकही हे फोन खरेदी करत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेल्या फोनसह अन्य काही उत्पादनांवर रिफर्बिश्ड असा उल्लेख केलेला असतो. रिफर्बिश्ड गॅजेट्स (Refurbished Gadgets) कमी किमतीत उपलब्ध असतात आणि त्यावर पुन्हा मोठा डिस्काउंटही दिला जातो. रिफर्बिश्ड म्हणजे काय, या उत्पादनांवर जास्त डिस्काउंट का दिला जातो असा प्रश्न तुमच्या मनात नक्की निर्माण झाला असेल. ते जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सातत्यानं सेलच्या (Sale) माध्यमातून रिफर्बिश्ड अर्थात नूतनीकरण केलेल्या उत्पादनांची विक्री केली जाते; पण ही उत्पादनं खरेदी करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक गॅजेट्समध्ये लहान स्वरूपाचे दोष (Defect) असतात. अशी गॅजेट्स आउटलेट किंवा विक्रेत्याकडून परत आलेले असतात. अशा गॅजेट्समधले दोष आणि कमतरता दूर करून ती वापरण्यायोग्य बनवली जातात. परंतु, ही उत्पादनं सेकंड हँड नसतात. त्यामुळे त्यांना रिफर्बिश्ड गॅजेट्स असं म्हणतात. रिफर्बिश्ड गॅजेट्सच्या नावाखाली बहुतांश वेळा स्मार्टफोन (Smartphone) आणि लॅपटॉपटची (Laptop) विक्री केली जाते. यात प्रामुख्याने अ‍ॅपलसह अन्य नामांकित कंपन्यांची प्रीमियम उत्पादनं समाविष्ट असतात. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवेळी तुम्ही नेमकं कोणतं गॅजेट घेत आहात, याची पडताळणी करणं आवश्यक आहे. किरकोळ दोष असल्यानं अशी गॅजेट ई-कचऱ्यात जाण्यापासून रोखण्यासाठी रिफर्बिश्ड गॅजेटची विक्री सुरू झाली. त्यामुळे रिफर्बिश्ड गॅजेट खरेदी करणं अयोग्य नाही. तुम्ही काळजीपूर्व अशी उत्पादनं खरेदी केली तर तुम्हाला नुकसान सोसावं लागणार नाही; मात्र अशी गॅजेट्स मोठ्या प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करावीत. (Smartwatch ने FASTag स्कॅन करून होऊ शकते चोरी? VIRAL VIDEO मधील दावा किती खरा?) रिफर्बिश्ड गॅजेट खरेदी करताना काही विशेष गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. सामान्य उत्पादनांवर जशी वॉरंटी आणि अ‍ॅक्सेसरीज (Accessories) मिळतात, तशाच या गोष्टी रिफर्बिश्ड उत्पादनांवरही दिल्या जातात. त्यामुळे अशा वस्तू खरेदी करताना किती महिन्यांची वॉरंटी मिळत आहे, हे पाहणं आवश्यक आहे. रिफर्बिश्ड असो अथवा सामान्य उत्पादन, कंपनीकडून या दोन्ही उत्पादनांवर दिल्या जाणाऱ्या सर्व अ‍ॅक्सेसरीज ग्राहकांना मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे रिफर्बिश्ड उत्पादन खरेदी करताना तुम्हाला कोणत्या अ‍ॅक्सेसरीज मिळणार आहेत, ते एकदा तपासून घ्या. तुम्ही जे गॅजेट खरेदी करत आहात, ते कंपनीनं रिफर्ब केलं आहे की एजन्सीने, ते तपासून घ्या. एखादं गॅजेट त्याच कंपनीनं रिफर्ब केलं असेल तर ते खरेदी करण्यास हरकत नाही. कारण संबंधित कंपनीला आपल्या उत्पादनाची चांगली माहिती असते. रिफर्बिश्ड गॅजेटमधली फीचर्स सामान्य गॅजेटसारखीच असतात. एका विशिष्ट प्रक्रियेनंतर रिफर्बिश्ड गॅजेट्स ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी आणली जातात. विक्रीला आणण्यापूर्वी त्यांची चाचणी घेतली जाते. ती यशस्वी झाली, तरच ही गॅजेट्स कमी किमतीला विकली जातात.
    First published:

    Tags: Mobile, Online shopping

    पुढील बातम्या