मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /RD 350 होती देशातली पहिली सुपर बाइक, असं काय घडलं की, करावी लागली बंद?

RD 350 होती देशातली पहिली सुपर बाइक, असं काय घडलं की, करावी लागली बंद?

Yamaha RD 350 ला एक रॅपिड मशिन म्हणूनही ओळख होती. कारण, 100 किमीप्रतितास वेग गाठण्यासाठी या बाइकला फक्त 4 ते 6 सेकंदाचा वेळ लागत होता.

Yamaha RD 350 ला एक रॅपिड मशिन म्हणूनही ओळख होती. कारण, 100 किमीप्रतितास वेग गाठण्यासाठी या बाइकला फक्त 4 ते 6 सेकंदाचा वेळ लागत होता.

Yamaha RD 350 ला एक रॅपिड मशिन म्हणूनही ओळख होती. कारण, 100 किमीप्रतितास वेग गाठण्यासाठी या बाइकला फक्त 4 ते 6 सेकंदाचा वेळ लागत होता.

मुंबई, 19 जुलै : आज जर रस्त्याने एखादी सुपरबाइक सुसाट वेगात गेली तर त्याचं फार असं अप्रूप वाटत नाही. एकापेक्षा एक अशा होंडा, हिरो, TVS, सुझुकीच्या सुपर बाइक तुम्हाला पाहण्यास मिळतील. पण, यातील एकही बाइक आजपर्यंत या सुपर बाइकची बरोबरी करू शकले नाही. त्या बाइकचं नाव होतं RD350.

यामाहा RD350 नावाने ओळखली जाणारी ही भारतातील पहिली सुपर बाईक. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ही फेव्हरट बाइक आहे. एवढंच नाहीतर जॅकी श्रॉफ आणि जॉन अब्राहमसह अनेक अभिनेत्यांचीही बाइक फेव्हरट होती. अनेक हिंदी सिनेमात तुम्ही ही दोन सायलेन्सरवाली बाइक पाहिली असेल.

या बाइकला काही लोकं यामाहा 350 किंवा राजदूत 350 म्हणूनही ओळखतात. भारतात RD 350 ला Escorts ग्रुपने तयार केले होते. त्यानंतर राजदूत आणि  जपानी कंपनी यामाहाने ही बाइक तयार करण्याचा करार झाला होता.

1983 ला भारतात RD 350 लाँच करण्यात आली. त्यावेळी या बाइकची एक्स शोरुम किंमत ही फक्त 18 हजार रुपये इतकी होती. पण  त्याकाळात 18 हजार रुपये ही खूप मोठी किंमत होती.

Yamaha RD लाँच केल्यानंतर यामध्ये अनेक मॉडेल काढण्यात आले होते. यात RX, RXZ आणि TZ 350 या बाइकचाही यात समावेश होता. यामाहाने या सर्व बाइक्समध्ये टू-स्ट्रोक इंजिन दिले होते, त्यानंतर टू- स्ट्रोक इंजिन बाइकचा एक ट्रेंडच आला.

Yamaha RD 350 मध्ये 347 सीसीचे टू-स्ट्रोक ट्विन-सिलिंडर इंजिन दिले होते. भारतात यामध्ये दोन प्रकारचे मॉडेल होते एक  HT (हाय टॉर्क) आणि दुसरे LT (लो टॉर्क). HT व्हेरियंट मॉडेलमध्ये 31 बीएचपी इतकी ताकद होती. तर  LT मॉडेलमध्ये 27 बीएचपी ताकद होती. सुरुवातील फक्त HT मॉडेल विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर 1985 मध्ये LT हे मॉडेल लाँच करण्यात आले.  मुळात RD 350 ही जपानमध्ये लाँच करण्यात आलेल्या मुळ बाइकचेच रुप होते. जपानी RD 350 ही 40 bhp इतकी ताकद निर्माण करत होती. त्यामुळे भारतात bhp कमी करून ही बाइक लाँच करण्यात आली.

Yamaha RD 350 ला एक रॅपिड मशिन म्हणूनही ओळख होती. कारण, 100 किमीप्रतितास वेग गाठण्यासाठी या बाइकला फक्त 4 ते 6 सेकंदाचा वेळ लागत होता. सुरुवातीच्या मॉडेलमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले होते. त्यानंतर डिस्क ब्रेकही देण्यात आले.

या गाडीत 6 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला होता. भारतात अलीकडे जरी बाइक पाहिल्या तर त्यामध्ये फार फार तर 5 स्पीड गिअर बॉक्स देण्यात येत आहे. पण, त्यावेळी यामाहा RD350 मध्ये 5 आणि 6 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला होता. त्यामुळे ही बाइक 160 KMPH इतका वेग गाठू शकत होती.

त्यामुळेच शानदार पिकअप आणि तुफान वेग असलेली ही बाइक त्यावेळी पोलीस दलात सामील करण्यात आली होती. पण, इतका पिकअप आणि वेगावर नियंत्रण मिळवणे हे कठीण काम होते. एखाद्या नवीन बाइक चालवणाऱ्याने जर चुकून जरी एक्सलेटर वाढवला तर त्याचा अपघात हा अटळ होता. त्यामुळेच ही बाइक काही काळानंतर RD म्हणजे 'रेस डेथ' म्हणून ओळख मिळाली. त्याकाळी सोनसाखळी चोरं, दरोडेखोर हे या बाइकचा सर्रास वापर चोरी करण्यासाठी वापरत होते. त्यामुळे पोलिसांसाठी ही बाइक डोकेदुखी ठरत होती.

त्या काळात बाजारात आणखी एक मोठे प्रतिस्पर्धी होते ते म्हणजे रॉयल एनफिल्ड royal enfield, जावा. पण, RD 350 ची टक्कर होती थेट बुलेटसोबत. कारण, बुलेट आणि RD 350 चे वजन हे जवळपास सारखेच होते. पण, इंजिनच्या तुलनेत आजही RD 350 ही बुलेट पेक्षा एक पाऊल पुढेच आहे.

पण, RD 350 चे मायलेज आणि होणार अपघात पाहता या बाइकची विक्री कमी होत गेली.  त्यामुळे दुर्दैवाने पहिल्या वहिल्या  या सुपर बाइकचे 1990 मध्ये उत्पादन बंद करण्यात आले.

यामाहाने ही गाडी बंद केल्यानंतर कमी वजनाची, चांगलं मायलेज देणारी यामाहा RX 100 बाजारात आणली. बघता बघता या बाइकनेही धुमाकूळ घातला.  या बाइकने सर्वच विक्रम मोडीत काढले होते. पण, काळाच्या वेगात RD 350 पडद्याआड गेली. पण, अजूनही RD 350 ज्यांच्याकडे आहे त्यांनी जिवापाड या गाडीला जपून ठेवले आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, गोवा, दिल्ली अशा अनेक भागात RD 350 चाहत्याचे क्लब आहे जे या बाइकला अजूनही जिंवत ठेवून आहे.

First published: