PUC रिन्यू केली नसल्यास आरसी रद्द होणार, पुढील वर्षापासून नवीन नियम होणार लागू

PUC रिन्यू केली नसल्यास आरसी रद्द होणार, पुढील वर्षापासून नवीन नियम होणार लागू

सर्वच वाहनांना हा नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (The Ministry of Road Transport and Highways) पीयूसीसाठी नवीन कडक कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रान्स्पोर्टच्या वाहनांसाठी आधीच कडक कायदा केला असल्याने आता सर्वच वाहनांना हा नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे.

अनेकजण आपले पीयूसी(PUC) आणि इन्शुरन्स सर्टिफिकेट(insurance certificate) जवळ बाळगत नाही. त्याचबरोबर वेळेवर रिन्यू देखील करत नाहीत. त्यामुळे आता सरकारने जानेवारी 2021 पासून यामध्ये बदल करायचे ठरवले असून नवीन ऑनलाइन सिस्टीममुळे सरकारला पीयूसी रिन्यू न करणाऱ्यांची त्वरित माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सरकार नवीन सिस्टीम तयार करणार असून यामध्ये तुमच्या वाहनांची पीयूसी रिन्यू केली नसल्यास वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) रद्द करण्याची देखील कारवाई केली जाऊ शकते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 27 नोव्हेंबरला अधिसूचना जारी केली असून पीयूसी प्रणाली ऑनलाइन करण्यापूर्वी इतर भागधारकांकडून सूचना मागविल्या आहेत.

प्रक्रिया पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी दोन महिने लागू शकतात, असे बातमीत नमूद करण्यात आले आहे. जानेवारी 2021 पासून नवीन अधिसूचना लागू झाल्यास विशिष्ट कालावधीत कोणत्याही वाहनांची पीयूसी रिन्यू करणे बंधनकारक होणार आहे. वाहन मालकास पीयूसी रिन्यू करण्यासाठी करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येईल. या कालावधीत त्यांनी रिन्यू न केल्यास त्यांच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र जप्त करण्यात येईल.

या नवीन सिस्टीममध्ये वाहन मालकासंदर्भातील माहिती मोटार वाहन डेटाबेस सर्व्हरवर अपडेट केली जाणार आहे. यामुळे यापुढे वाहनचालकांना पीयूसी सर्टिफिकेट(PUC certificate) न घेता वाहने वापरणे कठीण जाणार आहे. यामध्ये वाहन मालकाला मोबाइल नंबर द्यावा लागणार आहे. ज्यावर त्यांना एक ओटीपी(OTP) प्राप्त होणार आहे. यामध्ये कुणीही घोळ घालू नये म्हणून ही नवीन सिस्टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये वाहनामधून जास्त प्रमाणात धूर बाहेर पडत असल्यास वाहनाची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले जाणार आहे. वाहनधारकांना त्यांची वाहने दुरुस्त करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाईल. हाच नियम ट्रान्स्पोर्टच्या वाहनांनाही लागू करण्यात येणार आहे.

दरम्यान, वाहन उत्सर्जनाचे नवीन कठोर नियम वाहन मालकांनी नक्की पालन करावे. हवेची गुणवत्ता खराब होण्यास खराब वाहनांचे प्रदूषण कारणीभूत नाही. परंतु उत्सर्जनाचे सर्व नियम पाळले जात आहेत की नाही यासाठी ही नवीन सिस्टीम तयार करण्यात आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 3, 2020, 7:55 PM IST
Tags: vehicles

ताज्या बातम्या