Home /News /auto-and-tech /

धोनीच्या ताफ्यात आणखी एक स्पेशल कार, निवृतीच्या दिवशी आली घरी, पाहा हा VIDEO

धोनीच्या ताफ्यात आणखी एक स्पेशल कार, निवृतीच्या दिवशी आली घरी, पाहा हा VIDEO

रांची येथील फार्महाउसवर धोनीने आपल्या गाड्यांसाठी खास अशी जागा केली आहे. धोनीची पत्नी साक्षीने इंन्स्टाग्रामवर या कारचा फोटो शेअर केला आहे.

    रांची, 17 ऑगस्ट : भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी म्हणजे 15 ऑगस्टला धोनीच्या कारच्या ताफ्यात आणखी दमदार कार दाखल झाली आहे. ही कार आहे Pontiac Firebird Trans Am (पोंटिएक फायरबर्ड ट्रांस एम). ही एक लाल रंगाची शानदार कार आहे. मुळात ही एक विंटेज  1970 च्या दशकातील लोकप्रिय कार आहे. भारताच्या रस्त्यावर ही क्वचितच पाहण्यास मिळेल. रांची येथील फार्महाउसवर धोनीने आपल्या गाड्यांसाठी खास अशी जागा केली आहे. धोनीची पत्नी साक्षीने इंन्स्टाग्रामवर या कारचा फोटो शेअर केला आहे. साक्षीने या गाडीची व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. धोनीने खरेदी केलेल्या Pontiac Firebird ची स्टेअरिंग ही डाव्या बाजूला आहे. दोन दरवाजे असलेल्या या कारला  V8 बिग ब्लॉक इंजिन दिले आहे. यात हर्स्ट शिफ्टरसह 4-स्पीड Muncie ट्रांसमिशन दिले आहे.
    View this post on Instagram

    Major Mahi missing @mahi7781 !

    A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

    मात्र, धोनीने ही कार खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजले याबद्दल अद्याप खुलासा होऊ शकला नाही. पण अलीकडेच मुंबईत एका लिलावामध्ये Pontiac Firebird Trans Am क्लासिक कारची विक्री झाली. ही कार तब्बल 68.31 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली. धोनीची अशीच कार मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लिलावामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. पोंटिएकने पहिल्यांदा 1967 मध्ये आपली  फायरबर्ड सीरीजची सुरुवात केली होती. ही कार सध्या बाजारात असलेल्या अमेरिकेतील  Ford Mustang (फोर्ड मस्टँग) आणि Mercury Cougar (मरकरी कॉगर) सारख्या गाड्यांसोबत टक्कर देते. Pontiac Firebird व्यतिरिक्त धोनीकडे एकापेक्षा एक गाड्या आहे. धोनीकडे 6.2-लिटर V8 इंजिन असलेली Grand Cherokee Trackhawk  आहे.
    View this post on Instagram

    Welcome home ! @mahi7781 missing you ...#transam

    A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

    धोनीला  Jeep Grand Cherokee Trackhawk ही प्रचंड आवडली होती. त्यामुळेच त्याने ही शानदार गाडी तब्बल 1.16 कोटींना खरेदी केली. या गाडीत 6.2-लिटर सुपरचार्ज्ड V8 HEMI इंजिन आहे.  या इंजिनमधून तब्बल 707 bhp पॉवर आणि 875 Nm इतका टॉर्क जनरेट होतो. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. एवढंच नाहीतर या गाडीत 4-व्हील ड्राइव्ह सिस्टम दिली आहे. ही कार  3.62 सेंकदात 0-100 किलोमीटर प्रतितास इतका वेग गाठते. या गाडीची  केबिन ही Nappa लेदरने तयार करण्यात आली आहे. Jeep Grand Cherokee Trackhawk ची मुळ किंमतही  62 लाख रुपये आहे. पण त्यावेळी ही गाडी भारतात लाँच झाली नव्हती. त्यामुळे ही गाडी भारतात विक्री होत नव्हती. त्यामुळे धोनीने ही गाडी बाहेर देशातून मागवली. यासाठी त्याने जवळपास 1.16 कोटी रुपये मोजले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून एखादी वस्तू भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागतो, त्यामुळेच या गाडीची किंमतही  62 लाखांवरून 1.16 कोटींवर पोहोचली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या