मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

वाहनविश्वात क्रांती! लवकरच येणार 'OLA'ची इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जिंगमध्ये 150 किमी धावणार

वाहनविश्वात क्रांती! लवकरच येणार 'OLA'ची इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जिंगमध्ये 150 किमी धावणार

ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरीस या स्कूटरची किंमत आणि अन्य बाबींबद्दल उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरीस या स्कूटरची किंमत आणि अन्य बाबींबद्दल उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरीस या स्कूटरची किंमत आणि अन्य बाबींबद्दल उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली, 2 जुलै : ऑनलाइन रेंटेड कारची सुविधा पुरवणाऱ्या ओला (Ola) या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला असून, त्यांची पहिली बहुचर्चित इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच दाखल होणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर दाखल करणं हा ओला कंपनीच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे. स्वस्त किमतीत चांगली आणि भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त वाहतूक व्यवस्था निर्माण करणं हा त्यामागचा हेतू आहे. आपलं ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीनं कंपनीने 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक करून तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) जगातला सर्वांत मोठा इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडीओ ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ‘क्रांतीसाठी तयार व्हा’ अशी कॅप्शन देत त्यांनी ही स्कूटर कशी आश्चर्यकारक काम करते, याची झलक दाखवणारा हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'हे ट्विट वाचायला जितका वेळ लागेल, तेवढ्या वेळात ही स्कूटर शून्यावरून 60 किमीचा वेग घेते,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटच्या हवाल्याने 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. तुमची कार कमी मायलेज देतेय? पेट्रोलच्या वाढत्या किमतीदरम्यान फॉलो करा या फायदेशीर टिप्स ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर एकाच चार्जिंगमध्ये 150 किमी धावू शकेल. 90 किमी प्रतितास अशा कमाल वेगानं ती धावू शकेल. या स्कूटरसोबत होम चार्जर असेल. त्यामुळे ग्राहकांना घरीच ही स्कूटर चार्ज करता येईल. त्यासाठी वेगळी सोय करण्याची गरज नाही. नेहमीच्या इलेक्ट्रिक सॉकेटद्वारेच हे चार्जिंग करता येणार आहे, हे महत्त्वाचं. या वेगवान चार्जिंग सोल्यूशनमुळे ही स्कूटर केवळ 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल आणि तेवढ्या चार्जिंगवर ती 75 किलोमीटर धावू शकेल. इलेक्ट्रिक वाहनं वापरणाऱ्या ग्राहकांना कुठेही वाहन चार्ज करण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी कंपनी देशात ‘हायपरचार्जर नेटवर्क’ तयार करण्याची तयारी करत आहे. याअंतर्गत 400 शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉइंट उभारले जातील. पहिल्या वर्षी 100 शहरांमध्ये 5000 चार्जिंग पॉइंट्स स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे. नंतर टप्प्याटप्प्यानं एका लाख चार्जिंग पॉइंट्सचं उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल. या स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधादेखील उपलब्ध होणार असून, ओला इलेक्ट्रिक अ‍ॅपद्वारे चार्जिंग स्टेटसची माहिती मिळेल. तसंच या अ‍ॅपद्वारे चार्जिंग सर्व्हिसचे पैसेदेखील देता येतील. ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरीस या स्कूटरची किंमत आणि अन्य बाबींबद्दल उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, साधारण एक लाख रुपये किंमतीत ही स्कूटर उपलब्ध होईल, अशी चर्चा आहे. इलेक्ट्रिक स्कूटर क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या अथेर कंपनीच्या अथेर एनर्जी 450 एक्स (Ather 450 x) या स्कूटरला ही स्कूटर टक्कर देऊ शकेल, असंही म्हटलं जात आहे.
First published:

Tags: Electric vehicles

पुढील बातम्या