Home /News /auto-and-tech /

Ola हायड्रोजन कारच्या विरोधात का आहे? कंपनीच्या CEO ने दिलं कारण, म्हणाले..

Ola हायड्रोजन कारच्या विरोधात का आहे? कंपनीच्या CEO ने दिलं कारण, म्हणाले..

एका ट्विटला उत्तर देताना भावीश अग्रवाल यांनी लिहिले की, हायड्रोजन कारसाठी योग्य नाही. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान हे वीज वाहतुक करण्याचा अत्यंत अकार्यक्षम मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले.

    नवी दिल्ली, 19 जून : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) वाढत्या किमतीमुळे देशात पर्यायी इंधनांचा वापर करण्यावर प्रयोग चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑटोमोटिव्ह उद्योगात इंधन म्हणून हायड्रोजनची खूप चर्चा आहे. अनेक कंपन्या भविष्यातील वाहनांसाठी हरित आणि स्वच्छ ऊर्जा उपाय शोधत आहेत. अनेक ऑटोमेकर्स वाहनांना उर्जा देणाऱ्या हायड्रोजन फ्युएल सेल टेक्नॉलॉजीवर काम करत असताना, ओला इलेक्ट्रिकचे (Ola) सीईओ भावीश अग्रवाल यांनी मात्र याला विरोध केला आहे. एका ट्विटला उत्तर देताना भावीश अग्रवाल यांनी लिहिले की, कारसाठी हायड्रोजन योग्य नाही. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान हे वीज वाहतुक करण्याचा अत्यंत अकार्यक्षम मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “पहिल्यांदा विजेचा वापर करुन हायड्रोजनची निर्मिती केली जाते. नंतर तोच H2 दाबाच्या स्वरूपात इंधन केंद्रांवर नेला जातो आणि कारमध्ये भरला जातो. नंतर कारमधील इंधन सेलमध्ये त्याचे विजेमध्ये रूपांतर होते. वीज वाहतुकीचा अतिशय कुचकामी मार्ग आहे. हायड्रोजन तयार करण्यासाठी कार्बन उत्सर्जन होत नाही ग्रीन हायड्रोजन हे सर्वात कमी कार्बन उत्सर्जित करणारे इंधन म्हणून ओळखले जाते. याने वाहने चालवली जाऊ शकतात. दुसरीकडे, लिथियम-आयन बॅटरी तयार करण्याच्या प्रक्रियेतून पर्यावरणात कार्बन उत्सर्जित होतो. पण, ग्रीन हायड्रोजन यापासून मुक्त आहे. त्याचा इंधन म्हणून वापर केल्यास टेलपाइपमधून फक्त पाणी बाहेर येते. हायड्रोजन उर्जा निर्मितीचा विस्तार ही अशी गोष्ट आहे, जी ऑटोमेकर्स हायड्रोजन-चलीत वाहनांच्या विकासात अडथळा म्हणून पाहतात. तसेच हायड्रोजनची उपलब्धता नसणे हा देखील चिंतेचा विषय आहे. लिथियम-आयन बॅटरीपेक्षा हायड्रोजन हा उत्तम पर्याय हायड्रोजन ऊर्जेचा आणखी एक फायदा म्हणजे लिथियम-आयन बॅटरीद्वारे चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा इंधन भरण्यासाठी किंवा रिचार्ज करण्यासाठी कमी वेळ लागतो. हायड्रोजन वाहनांमध्ये बॅटरी पॅकचा आकार देखील खूप लहान असतो. याव्यतिरिक्त, हायड्रोजन इंधन लिथियम-आयन बॅटरीच्या विपरीत, निकेल आणि कोबाल्टसारख्या दुर्मिळ धातू वापरत नाही. एकंदरीत, हायड्रोजन हा इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम-आयन बॅटरीचा उत्तम पर्याय मानला जातो.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Electric vehicles

    पुढील बातम्या