मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

OLA on Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर OLA ची मोठी घोषणा

OLA on Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर OLA ची मोठी घोषणा

फोटो-सोशल मी़डिया

फोटो-सोशल मी़डिया

ओलाची पहिली कार 2024 मध्ये येईल आणि ती उत्तम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : ओला इलेक्ट्रिकने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक जगाला दाखवली आहे. यासोबतच कंपनीने नवीन स्कूटर Ola S-1 लाँच केली आहे. कंपनीचे सीईओ भावेश  अग्रवाल यांनी सांगितले की, Ola S1 ची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये असेल. ओलाचे हे दुसरे इलेक्ट्रिक उत्पादन आहे. भावेश अग्रवाल यांनी ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारबाबत सांगितले की, ओलाची पहिली कार 2024 मध्ये येईल आणि ती उत्तम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. ओलाच्या इलेक्ट्रिक कारची रेंज 500 किमी असेल. ओला इलेक्ट्रिक कारमध्ये सर्व ग्लास रूफ (काचेचे छप्पर) असेल. यामुळे कारच्या एरो-डायनॅमिक्समध्ये सुधारणा होईल. ओलाने नुकतीच आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली आहे. भावेश अग्रवाल यांनी सांगितले की, ओलाची कार केवळ की लेस नाही तर ती चालकविनाही चालवली जाईल. यात असिस्टेड ड्रायव्हिंग फीचर्स देखील मिळतील. ही कार सर्वात वेगवान असेल, असा दावा त्यांनी केला. भावेश म्हणाले की, ही भारतात बनवलेली सर्वात स्पोर्टी कार असेल. दोन व्हीकल प्लॅटफॉर्म आणि सहा वेगवेगळ्या कार विकसित करण्याची त्यांची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व तामिळनाडू येथील कारखान्यात तयार केले जातील. Ola S-1 स्कूटरसाठी बुकिंग - याशिवाय कंपनीने Ola S-1 बाजारात आणले आहे. भावेशने सांगितले की, नवीन Ola S-1 स्कूटरचे बुकिंग आजपासून सुरू होत आहे. केवळ 499 रुपये भरून विशेष इंट्रोडक्टरी किंमतीवर ही बुक केली जाऊ शकते. नवीन ई-स्कूटरची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ती चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, ओला एस-1 ही एस-1 प्रो सारखीच दिसते. हेही वाचा - गुडन्यूज! iPhone 12 खरेदी करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर Ola S1 Pro कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केले होते. Ola S1 मध्ये 3 kWh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन स्कूटरची रेंज 131 किमी आणि टॉप स्पीड 95 किमी/तास आहे. नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाल, जेट ब्लॅक, पोर्सिलेन व्हाइट, निओ मिंट आणि लिक्विड सिल्व्हर या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये मिळणार आहे.
First published:

पुढील बातम्या