मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Facebook, Instagram काय घेऊन बसलाय; आता तुमचा फोटो पाठवा थेट चंद्रावर; खर्चाची तर चिंताच नको!

Facebook, Instagram काय घेऊन बसलाय; आता तुमचा फोटो पाठवा थेट चंद्रावर; खर्चाची तर चिंताच नको!

हा खर्च तुमच्या खिशाला परवडणारा आहे..

हा खर्च तुमच्या खिशाला परवडणारा आहे..

हा खर्च तुमच्या खिशाला परवडणारा आहे..

वॉशिंग्टन, 26 जानेवारी :आपल्या पृथ्वीवरच्या मित्र-मैत्रिणींना पार्सल्स किंवा डिजिटल मेसेजेस पाठवणं, ही गोष्ट आता जुनी झाली. नवा ट्रेंड आहे डिजिटल मेसेजेस (Digital Messages) अवकाशात पाठवण्याचा. एका यू-ट्यूबरने नासा (NASA) या संस्थेशी करार करून त्यांच्या पुढच्या चांद्रमोहिमेवर जाणाऱ्या यानातली काही जागा विकत घेतली आहे. त्यातून तो चंद्रावर हार्ड ड्राइव्ह (Hard Drive) पाठवणार आहे. आपले मित्र आपल्याला पेन ड्राइव्हवरून टॉरंटवरच्या मूव्हीज आणि म्युझिक पाठवत असले, तरी चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या या एन्क्रिप्टेड हार्ड ड्राइव्हमधून पाठवण्याचा डेटा निश्चित होतोय. या हार्ड ड्राइव्हमधून इच्छुकांचे फोटो चंद्रावर पाठवले जाणार आहेत. अगदी तुम्हीही या उपक्रमातून फोटो पाठवू  शकता.

इंटरनेटवर मिस्टर बीस्ट (MrBeast) या नावाने प्रसिद्ध असलेल्या जिम्मी डोनाल्डसन (Jimmy Donaldson)  या यू-ट्यूबरने पेरेग्रिन मिशन वन (Peregrine Mission One) या चंद्रावर उतरणार असलेल्या लँडरमधील (Lander) काही जागा विकत घेतली आहे. हे यान नासा आणि अॅस्ट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजी (Astrobotic Technology) या खासगी कंपनीने पुरस्कृत केलं आहे. अंतराळातला प्रवास आणि संशोधन यांसाठीचं रोबॉटिक तंत्रज्ञान विकसित करण्यात अॅस्ट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजी या कंपनीचा हातखंडा आहे. जून 2021मध्ये हे यान युनायटेड लाँच अलियान्स व्हल्कन रॉकेटद्वारे अवकाशात प्रक्षेपित केलं जाणार आहे.

24 जानेवारी रोजी मिस्टर बीस्टने त्याच्या ट्विटर अकाउंटवर घोषणा केली, की कोणाला चंद्रावर फोटो पाठवायचे असतील, तर केवळ 10 डॉलरमध्ये (729 रुपये) ही सुविधा त्याने उपलब्ध केली आहे. 'युनिव्हर्स'स फर्स्ट डिजिटल टाइम कॅप्सुल' असं त्याने या प्रकल्पाचं वर्णन केलं आहे.

ट्विटर पोस्टबरोबरच त्याने त्याच्या फॅन्ससाठी लाइव्ह स्ट्रीमही केलं आणि त्यातून या प्रकल्पाबद्दलची माहिती दिली. 'या हार्ड ड्राइव्हमधून तुम्हाला जे पाठवायचं असेल, ते चंद्रावर पाठवण्यात तुम्हाला मजा येईल, असं मला वाटतं,' असं त्याने सांगितलं.

हे देखील वाचा - FAU-G गेम होणार लाँच; Pre-Registration ला सुरुवात! कुठे आणि कसा करायचा डाउनलोड?

दी अॅट्रॉबॉटिक टेक्नॉलॉजीच्या पेरेग्रिन मिशन वन लुनार या मोहिमेत सरकारी आणि खासगी असे दोन्ही प्रकारचे पेलोड्स (Payloads) असतील. नासाचे 14, तर व्यावसायिक तत्त्वावरील 19 पेलोड्स त्यावर असतील. अर्थातच, मिस्टर बीस्टचा हार्ड ड्राइव्ह हा खासगी व्यावसायिक उपक्रमांतर्गत चंद्रावर पाठवला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत नासाने चंद्रावर पाठवायच्या व्यावसायिक पेलोड्स सेवेसाठी तीन खासगी कंपन्यांशी करार केला आहे. त्यात अॅस्ट्रॉबॉटिकसह इन्ट्युटिव्ह मशीन्स आणि ऑर्बिट बीयाँड यांचा समावेश आहे. या कंपन्या पेलोड्स नेण्याचं काम करतात.

सुमारे 50 वर्षांपूर्वी अपोलो 17 हे यान चंद्रावर उतरलं होतं. त्यानंतर अॅस्ट्रॉबॉटिकचं यान चांद्रभूमीवर उतरणारं पहिलं अमेरिकन यान ठरणार आहे. त्यासाठी या कंपनीने 79.5 मिलियन डॉलरचा (पाच अब्ज 76 कोटी 39 लाख 58 हजार 500 रुपये) करार केला आहे. या यानात 'नासा'च्या पेलोड्सनंतर उरलेली जागा ही कंपनी अन्य व्यावसायिकांना विकू शकते. त्याअंतर्गत मिस्टर बीस्टने हार्ड ड्राइव्ह पाठवण्यासाठी यानातली जागा विकत घेतली.

कंपनीने 2019मध्ये दिलेल्या माहितीनुसार, विविध देशांचे 18 पेलोड्स यानात असणार आहेत. त्यात सहा देशांतले सात रोव्हर्स (Rovers), चार देशांतली उपकरणं आणि अन्य काही पेलोड्सचा समावेश आहे.

First published:

Tags: Nasa, Photo, Technology, Youtubers