Home /News /auto-and-tech /

अरे व्वा! आता इंटरनेटशिवायदेखील WhatsApp होईल सुरू; जाणून घ्या प्रक्रिया

अरे व्वा! आता इंटरनेटशिवायदेखील WhatsApp होईल सुरू; जाणून घ्या प्रक्रिया

इंटरनेट कनेक्शन खंडीत झाल्यास सगळीकडे व्हॉट्सअॅप बंद होते. आता या समस्येवर व्हॉट्सअॅपने उपाय शोधला असून, एका नवीन फीचरमुळे व्हॉट्सअॅप कोणत्याही डिव्हाइसशी लिंक करण्यासाठी स्मार्टफोन ऑनलाइन ठेवण्याची गरज पडणार नाही.

    नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : इन्स्टट मेसेजिंग अॅप (Messaging App) असलेले व्हॉट्सअॅप (WhatsApp) जगभरातील एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखले जाते. जगभरातील कोट्यवधी लोक अॅपचा वापर करतात. सहजपणे वापर करता येणं ही त्याची खासियत आहे. भारतात तर व्हॉट्सअॅप वापरत नाहीत असे फार कमी लोक आढळतील. व्हॉट्सअॅपही नेहमीच आपल्या युझर्सना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी नवीन फीचर्स (New Features) आणि अपडेट्स (Updates) आणत असते. आजकाल आपल्या देशात खेड्यापाड्यातही इंटरनेट (Internet) पोहोचल्यामुळे प्रत्येकजण स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप वापरत असतो. एकावेळी अनेक उपकरणांमध्येही (Device) व्हॉट्सअॅप वापरता येते. मात्र त्यासाठी स्मार्टफोन ऑनलाइन ठेवण्याची गरज असते. अशावेळी इंटरनेट कनेक्शन खंडीत झाल्यास सगळीकडे व्हॉट्सअॅप बंद होते. आता या समस्येवर व्हॉट्सअॅपने उपाय शोधला असून, एका नवीन फीचरमुळे व्हॉट्सअॅप कोणत्याही डिव्हाइसशी लिंक करण्यासाठी स्मार्टफोन ऑनलाइन ठेवण्याची गरज पडणार नाही. अँड्रॉइड आणि आयओएस युझर्स आता व्हॉट्सअॅपवर मल्टी-डिव्हाइस फीचर (Multi Device Feature) वापरू शकतील. आतापर्यंत युझर्स त्यांच्या स्मार्टफोन डेस्कटॉपशी (Desktop) लिंक करून डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असत. मात्र त्यावेळी त्यांना त्यांचा स्मार्टफोन ऑनलाइन ठेवावा लागत असे. आता व्हॉट्सअॅप आपल्या युझर्सना स्मार्टफोनशिवाय इतर डिव्हाइस ऑनलाइन लिंक करण्याची परवानगी देणारे नवीन फिचर दाखल करणार आहे. सध्या हे फिचर बीटा (Beta) टप्प्यात असून, हे एक ऑप्ट-इन फिचर (Opt-in Feature)आहे. सेटिंग्ज मेनूमधील लिंक्ड डिव्‍हायसेस ऑप्शनमध्‍ये ते 'बीटा' या लेबल खाली देण्यात आलं आहे. हे ही वाचा-WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार हा ऑप्शन एनेबल केल्यास, तुम्‍हाला सर्व डिव्‍हाइसेसवरून अनलिंक केले जाईल आणि तुम्ही नव्याने लिंकिंग केल्यावर, ते पूर्वीप्रमाणे वापरू शकाल. आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनची गरज पडणार नाही. या नवीन फीचरमुळे जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप वेब (WhatsApp Web)वापरता तेव्हा तुम्हाला तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपजवळ ठेवावा लागणार नाही. तुम्ही मॅन्युअली लॉग आउट न केल्यास, लिंक केलेले डिव्‍हाइस 14 दिवसांपर्यंत मेसेज मिळवू आणि पाठवू शकेल. तुमचा स्मार्टफोन हरवला तरी तुम्हाला तुमच्या सिस्टीमवर व्हॉट्सअॅप कनेक्ट करता येईल. सध्या अॅपच्या आयओएस (iOS) व्हर्जनमध्ये, तुम्ही लिंक केलेल्या डिव्हाइसवरून मेसेज डिलीट करू शकणार नाही. तुम्ही सेकंडरी स्मार्टफोन किंवा टॅबलेटला प्रायमरी डिव्हाइसशी लिंक करू शकत नाही. तुम्ही तुमचा प्रायमरी स्मार्टफोनच लॅपटॉपशी लिंक करू शकता. हा नियम फक्त आयओएस युझर्ससाठी (iOS Users)आहे. अँड्रॉइड युझर्स (Android Users)त्यांचे डिव्हाइस सेकंडरी स्मार्टफोनशी लिंक करू शकतात.
    First published:

    Tags: Internet, Mobile, Smart phone, Whatsaap

    पुढील बातम्या