नवी दिल्ली, 18 जुलै : एकीकडे इंधनाचे वाढते दर पाहता इलेक्ट्रिक कार (Electric Car) ची विक्री आणि उत्पादन आणखी वाढावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक वाहनांना आता एक वेगळी ओळख मिळणार आहे. त्याच बरोबर बीएस-6 वाहनांसाठी नंबर प्लेटवर नवीन रंग आणि स्टिकर असणार आहे.
आता यापुढे इलेक्ट्रिक गाड्यांची नंबर प्लेटही वेगळ्या रंगाची असणार आहे. या गाड्यांची नंबर प्लेट (Car Number Green Plate ) हिरव्या रंगात असणार आहे. याबद्दल केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, 'ज्या गाड्या या बॅटरीवर चालणाऱ्या आहे. त्या गाड्यांची वेगळी ओळख असावी यासाठी त्यांच्या नंबर प्लेट या हिरव्या रंगात असणार आहे आणि त्यावर पिवळ्या रंगाची अक्षर असावी.'
पेट्रोलची चिंता नाही! 44000 रुपयात खरेदी करा ही स्कूटर,वाचा काय आहेत फीचर्स
याबद्दल दळणवळण मंत्रालयाने एक अध्यादेश जारी केला आहे. या गाड्यांची नोंदणी करत असताना नंबर प्लेट ही पिवळ्या रंगात असणार आहे आणि त्यावर लाल रंगात अक्षर असतील. परंतु, डिलरकडे असलेल्या गाड्यांची नंबर प्लेटही लाल रंगाची असावी आणि त्यावर पांढऱ्या रंगात अक्षरं असावी.
राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशात वाहनांनी नोंदणी आणि चिन्हांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, बारामतीसाठी अजितदादांनी अधिकाऱ्यांना बजावलं
या अधिसूचनेमुळे वाहनांचा रंग आणि त्यावरील नंबर प्लेट, अक्षरांचा रंग हे अधिक ठळकपणे वाचण्यास मदत होईल. हे नियम स्पष्टपणे लोकांना समजावे, यासाठी ही अध्यादेश काढण्यात आला आहे, असंही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
बीएस-6 गाड्यांनाही नवीन नियम
1 ऑक्टोबरपासून बीएस 6 चारचाकी वाहनांची नंबर प्लेटवर हिरव्या रंगाची एक पट्टी असणार आहे. बीएस-6 वाहनांच्या रजिस्ट्रेशनची माहिती असलेल्या भागावर किंवा नंबर प्लेटवर ही हिरव्या रंगाची एक पट्टी असणार आहे. त्यामुळे बीएस 6 वाहनं ही लगेच ओळखता येतील. हे नवीन नियम पेट्रोल, डिझेल, सीएनजी तिन्ही प्रकारांच्या गाड्यांवर लागू होणार आहे.
गाड्यांसाठी असणार स्टिकर
बीएस-6 चारचाकी गाड्यांच्या नंबर प्लेटवर 1 सेंटीमीटर जाड पट्टी लावावी लागणार आहे. वाहन कोणत्या इंधनावर चालते त्यानुसार, एक स्टिकर सुद्धा लावले जाणार आहे. पेट्रोल आणि सीएनजी गाड्यांवर निळ्या रंगाचे स्टिकर असणार आहे. तर डिझेल गाड्यांवर ऑरेंज रंगाचे स्टिकर असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.