OMG! लॉटरीच लागली, 'या' कार खरेदी करा फक्त 5 लाखांपर्यंत

OMG! लॉटरीच लागली, 'या' कार खरेदी करा फक्त 5 लाखांपर्यंत

तुम्ही सुद्धा आता तुमचं कार खरेदी करायचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि ते देखील फक्त 5 लाखांमध्ये..!

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: स्वतःची पहिली कार घ्यायची असेल, तर सखोल अभ्यास करून घेतली जाते. मनीकंट्रोल डॉट कॉमवर पार्थ चरण यांनी पाच लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बसणाऱ्या पाच कार्सची माहिती दिली आहे. ती पाहू या.

25 कोटींहून अधिक कार भारतातल्या रस्त्यांवर धावत आहेत. तरीही कार घेणं ही अजूनही चैनीची गोष्ट आहे आणि ती देशाच्या एक चतुर्थांशपेक्षा कमी लोकसंख्येला परवडू शकते. कार घेणं ही अनेकांची महत्त्वाकांक्षा असते आणि त्याबद्दल बरीच चौकशी करून ती घेतली जाते. एंट्री लेव्हल कार्समध्ये अगदी आवश्यक त्या सुविधा मिळू शकतात. पण आवश्यक त्या सुविधांच्या व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. कोरोना महामारीच्या काळात आरामदायी आणि सुरक्षित वैयक्तिक प्रवासाचं साधन म्हणून तुम्ही कार घ्यायचा विचार करत असाल, तर परवडण्यासारखे अनेक पर्याय आहेत. ड्रायव्हर एअरबॅग (Airbag) आणि एबीएस (ABS) या सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या फिटमेंट्स सगळ्याच कार्समध्ये असतात. तुम्हाला टू-व्हीलरवरून फोर व्हीलरवर अपग्रेड व्हायचं असेल, तर हे काही चांगले पर्याय आहेत.

मारुती सुझुकी एस-प्रेसो - (Maruti Suzuki S-Presso)

ऑन रोड किंमत : 4.06 लाख (STD) ते 5 लाख (VXI Plus)

सीएनजी पर्याय : उपलब्ध

दावा करण्यात आलेलं मायलेज : 21.4 किलोमीटर प्रति लिटर

व्हॅल्यू फॉर मनी : 4/5

तुलनेने बाजारपेठेत नवी असलेली मारुतीची एसप्रेसो ही कॉम्पॅक्ट एसयूव्हीप्रमाणे (SUV) डिझाइन केलेली कॉम्पॅक्ट हॅचबॅकमधून (Hatchback) उत्क्रांत झालेली कार आहे. या कारच्या इंजिनची क्षमता एक हजार सीसी आणि 67 बीएचपी आहे. या कारमध्ये प्रशस्त जागा आहे आणि ड्रायव्हिंग पोझिशन उंच आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या मोठ्या कार्सचं दडपण न येता तुम्ही अगदी सहज ड्राइव्ह करू शकता. यात 270 लिटरची भव्य बूट स्पेस असून हेड रूमही चांगली आहे. मात्र जास्त वेगाने चालवताना स्थिरतेचा अनुभव  देण्यात ही कार थोडी कमी पडते. नेहमीच्या प्रवासासाठी ही कार चांगली आहे. एएमटी गिअरबॉक्सची सुविधा पर्यायी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने लायसन्स घेतलेल्यांसाठी ती उपयुक्त आहे. बजेट थोडं वाढवू शकत असाल तर 5.67 लाख (ऑन रोड) रुपये किमतीला कंपनी फिटेड सीएनजी मॉडेल उपलब्ध आहे. हायर व्हॅरिएंट्समध्ये स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स आणि सात इंची टचस्क्रीन सेंटर कॉन्सोल आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, एबीएस विथ ईबीडी उपलब्ध आहे. पॅसेंजर बॅग मात्र अतिरिक्त पर्याय म्हणून उपलब्ध असेल.

रेनॉल्ट क्विड - (Renault Kwid)

ऑन रोड किंमत : 3.08 लाख (STD) ते 4.61 लाख (RXL)

सीएनजी पर्याय : उपलब्ध नाही.

दावा करण्यात आलेलं मायलेज : 21 ते 24 किलोमीटर प्रति लिटर

व्हॅल्यू फॉर मनी : 2/5

एंट्री लेव्हल हॅचबॅक श्रेणीमध्ये क्विड ही पहिली ब्रेकाउट स्टार असलेली कार होती. त्याचं कारण होतं त्या श्रेणीत तोपर्यंत कधीच पाहायला न मिळालेलं मस्क्युलर आणि नवं डिझाइन. क्विडचं इंजिन 800 सीसीचं असून, पाच लाखांच्या बजेटमध्ये बसणारी ही कार फार उत्साही ड्रायव्हर्ससाठी नाही. एएमटीचा (AMT) पर्याय काहीसा महाग असू शकतो, पण नव्याने ड्रायव्हिंग शिकलेल्यांसाठी ती चांगली गुंतवणूक ठरेल. तरीही तुम्हाला उत्तम परफॉर्मन्स हवा असेल, तर मॅन्युअल गीअरचीच कार घ्या. एस-प्रेसोप्रमाणेच  क्विडलाही मोठी बूट स्पेस आहे, पण तिच्याप्रमाणेच क्विडची उंची मात्र चांगली नाही. या कारचा ग्राउंड क्लिअरन्स 184 मिलिमीटरचा असून, प्लास्टिकचा विपुल प्रमाणात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही कार शहरात चालवण्यासाठी चांगली, सोपी आहे.  या कारचं स्टँडर्ड मॉडेल म्हणजे या श्रेणीतल्या सर्वांत स्वस्त कार्सपैकी एक आहे. पण केवळ 800 सीसीचं इंजिन आणि कमी दर्जाच्या मटेरियलच्या वापरामुळे या कारचं अपील तितकंसं चांगलं नाही. यातल्या अधिक समाधानकारक सुविधा हव्या असतील, तर RXT व्हॅरिएंट (5.3 लाख) घेणं अधिक चांगलं.

डॅटसन गो - (Datsun GO)

ऑन रोड किंमत : 4.83 लाख (GO D)

सीएनजी पर्याय : उपलब्ध नाही.

दावा करण्यात आलेलं मायलेज : 19 किलोमीटर प्रति लिटर

व्हॅल्यू फॉर मनी : 3/5

डॅटसन गो या कारमध्ये वापरलेल्या प्लास्टिकचा दर्जा चांगला नाही, या कारचं सस्पेंशन उत्तम नाही आणि वेगाने जाताना आवश्यक स्थिरतेवर प्रश्नचिन्ह आहे. मग असं असतानाही डॅटसन गोचा विचार का करायचा? तर तिचं चांगलं इंजिन आणि उत्तम पॉवर टू वेट रेशो. या कारच्या सीट्स आरामदायी आहेत आणि परफॉर्मन्स चांगला आहे. ऑटोमेटिक ट्रान्स्मिशनचा पर्याय यात उपलब्ध नाही. पण डॅटसन गोच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये दोन एअरबॅग्ज येतात. त्यामुळे एबीएस, ईबीडी आणि ब्रेक असिस्ट या सुविधांमुळे गोची उपयुक्तता चांगली आहे. या कारच्या विरोधात जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे डॅटसन कंपनी भारतातील आपले व्यवहार बंद करत आहे. विक्रीपश्चात सेवा निस्सान कंपनीकडून मिळतील; पण त्यामुळे डॅटसनच्या कार्सना रिसेल व्हॅल्यू फार मिळणार नाही.

ह्युंडाई सँट्रो -(Hyundai Santro)

ऑन रोड किंमत : 5.2 ते 5.54 लाख (Era Executive)

सीएनजी पर्याय : उपलब्ध (6.48 लाख)

दावा करण्यात आलेलं मायलेज : 20 किलोमीटर प्रति लिटर

व्हॅल्यू फॉर मनी : 3/5

छोट्या आकाराच्या इऑन कारचं उत्पादन थांबवलं गेल्यामुळे ह्युंडाईला एंट्री लेव्हल श्रेणीत सँट्रोला पुन्हा आणण्यावाचून पर्याय नव्हता. या श्रेणीत पूर्वी ह्युंडाईचं वर्चस्व होतं. सँट्रोची किंमत बजेटपेक्षा थोडी जास्त असली, तरी चांगली पहिली कार म्हणून खरेदी करताना 'सँट्रो' ही तिची ओळख आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 1.1 लिटर पेट्रोल इंजिन 68 बीएचपी क्षमतेचं आहे. स्पर्धेतल्या बाकीच्या कार्सपेक्षा सँट्रो मोठी आहे. तसंच 1560 मिलीमीटरमुळे उंचही आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये केवळ एकच एअरबॅग येत असली, तरीही जागा, लेगरूम याबाबतीत ती मोठी आहे. यात 235 लिटर्सची बूटस्पेस आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर - (Maruti Suzuki Wagon R)

ऑन रोड किंमत : 5.07 ते 5.44 लाख (LXi)

सीएनजी पर्याय : उपलब्ध (6.14 लाख)

दावा करण्यात आलेलं मायलेज : 21.79 किलोमीटर प्रति लिटर

व्हॅल्यू फॉर मनी : 4/5

हे देखील वाचा - SBI मध्ये उघडा जन धन बचत खाते, मिळेल 2 लाखांपर्यंतचा असा फायदा

वॅगन आर ही कार बाकीच्या कार्सपेक्षा काहीशी डल वाटत असली, तरी प्रॅक्टिकल वापर आणि व्हॅल्यू फॉर मनी याचा विचार करता  फार थोड्या कार्सशी तिची तुलना होऊ शकते. वॅगन आरचं डिझाइन साधं असून, घरातल्या ज्येष्ठ सदस्यांना सहज बसता येतं. कारची हेड रूम आणि बूट स्पेस चांगली आहे. गेल्या दशकभराहून अधिक काळ ही कार त्या सेगमेंटचं प्रतीक बनली आहे. या कारचं इंजिन 998 सीसी क्षमतेचं, तीन सिलिंडरचं असून, ऑटोमॅटिक गिअर ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. सोपा मेन्टेनन्स, चांगली रिसेल व्हॅल्यू आणि शहरात सहज चालवता येणं हे या कारचे काही चांगले गुणधर्म आहेत.

Published by: Aditya Thube
First published: February 13, 2021, 8:06 AM IST

ताज्या बातम्या