Harley Davidson चं नाही, तर 'या' कंपन्या सुद्धा पडल्या भारताबाहेर!

Harley Davidson चं नाही, तर 'या' कंपन्या सुद्धा पडल्या भारताबाहेर!

अमेरिकेच्या रस्त्यावर 'दादा'गिरी करणाऱ्या हार्ली-डेविडसन (Harley Davidson) ला भारतातून गाशा गुंडाळावा लागला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : अमेरिकेच्या रस्त्यावर 'दादा'गिरी करणाऱ्या हार्ली-डेविडसन (Harley Davidson) ला भारतातून गाशा गुंडाळावा लागला आहे. आता ही कंपनी फक्त आपल्या मायभूमी अमेरिकेतच गाड्या विकणार आहे. पण, एकटी Harley Davidsonचं नाहीतर अनेक अशा दमदार गाड्या तयार करणाऱ्या गाड्यांना भारतातून बाहेर पडावे लागले आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठा ठप्प झाल्या आहे. सर्वच प्रकारच्या उद्योग-धंद्यात मोठ्या मोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात ऑटो इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले. यात सर्वात मोठा फटका बसला तो Harley Davidson ला. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असलेल्या नुकसान आणि भारतात वाहनांची विक्रीच होत नसल्यामुळे कंपनीला अखेर  भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.  मागील एका वर्षात Harley-Davidson ने फक्त 2,500 बाइकची विक्री केली होती. Harley-Davidson हा सर्वात खराब काळ ठरला आहे.

Harley-Davidsonचं नाहीतर याआधीही अनेक अशा मोठ्या कंपन्यांनी भारतातून पाय काढला आहे. या कंपन्यांचा भारतात फक्त 3 ते 4 वर्षच निभाव लागला होता. यात  जनरल मोटर्स, फिएट, Ssangyong, Scania, MAN आणि UM Motorcycles यांचा समावेश आहे.

UM Motorcycles ने सुद्धा भारतीय बाजारपेठेत दमदार एंट्री केली होती. UM Motorcycles ने रॉयल एनफिल्ड, बजाज आणि Harley-Davidson च्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी शानदार अशा क्रझर बाईक लाँच केल्या होत्या. कंपनीने गाड्यात लाँच केल्या पण त्यांची विक्रीच जास्त होऊ शकली नाही. त्यामुळे या कंपनीला अखेर गाशा गुंडाळावा लागला.

अमेरिकेच्या जनरल मोटर्ससोबत सुद्धा असेच झाले होते. जनल मोटर्स भारतात एकापाठोपाठ अनेक कार आणल्या होत्या. पण, त्यांची विक्रीच जास्त होऊ न शकल्यामुळे कंपनीला भारातून बाहेर पडावे लागले होते.

Scania, MAN या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू केले. बसेस आणि ट्रकची निर्मितीही केली. पण विक्री न वाढल्यामुळे त्यांनाही भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.

Harley-Davidson ने 2018 साली भारतात 3,413 बाइकची विक्री केली होती. 2019 साली फक्त 2676 युनिट्सची विक्री झाली. तब्बल 22 टक्क्यांनी विक्री घटली.  तर 2019-20 या आर्थिक वर्षात 2,500 पेक्षाही कमी बाईक विकल्या गेल्या. हा सगळ्या खराब रेकॉर्ड होता.

Harley-Davidson ही भारतातील दादा कंपनी असलेल्या रॉयल एनफील्डला टक्कर देण्याच्या तयारीत होती. यासाठी तिने चीनी कंपनी Qianjiang सोबत करार सुद्धा केला होता. यातून  350cc  इंजिनची बाइक आणण्याचा Harley-Davidsonचा प्लॅन होता. याच वर्षी ही बाइक लाँच होणार होती. पण, पुढे काही घडलेच नाही. अखेर Harley-Davidson ने आता भारतात बाइक उत्पादन न करण्याचा निर्णय घेऊन कायमचा रामराम ठोकला आहे.

Published by: sachin Salve
First published: September 25, 2020, 4:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading