• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • New Yamaha R15 लॉन्च, पाहा जुन्या आणि नव्या बाईकमध्ये काय आहे फरक, किंमत आणि फीचर्स

New Yamaha R15 लॉन्च, पाहा जुन्या आणि नव्या बाईकमध्ये काय आहे फरक, किंमत आणि फीचर्स

New Yamaha R15 लॉन्च, पाहा किंमत आणि फीचर्स (Photo: Yamaha)

New Yamaha R15 लॉन्च, पाहा किंमत आणि फीचर्स (Photo: Yamaha)

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लोडेड फीचर्स नव्या बाईकमध्ये उलब्ध आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : दुचाकी क्षेत्रात आघाडीचा ब्रँड असलेल्या यामाहाने (Yamaha) भारतीय बाजारपेठेत (Indian Market) नुकत्याच दोन नवीन स्पोर्ट्स बाईक (Sports Bikes) लॉन्च केल्या आहेत. यामाहाच्या बाईक्स भारतात खूप पूर्वीपासून लोकप्रिय आहेत. यामाहाने आणलेली आर 15 (Yamaha R15) ही तिची चौथी एडिशन असून, भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईक्सपैकी (Entry Level Sports Bike) ती एक आहे. यामाहा आर 15च्या प्रत्येक एडिशनमध्ये आधीच्या एडिशनपेक्षा उल्लेखनीय बदल झाले आहेत. नव्या आर 15मध्येही कंपनीनं ही परंपरा कायम ठेवली आहे. नवीन आर 15 आजच्या तरूणाईला आवडेल अशा अनेक अत्याधुनिक फीचर्सनी सुसज्ज असून, तिचं डिझाईनही अधिक आकर्षक आहे. त्या तुलनेत तिची किंमतही किफायतशीर आहे. यामाहा आर 15ची यापूर्वीचं एडिशन आणि नवीन एडिशन यातील फरक अगदी सहज लक्षात येतो. टाईम्स नाऊ न्यूज डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. फीचर्स : यामाहा आर15च्या तिसऱ्या एडिशनमध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट पॅनेल (LCD Panel) होते, परंतु नवीन आर15 मध्ये स्ट्रीट आणि ट्रॅक अशा दोन डिस्प्ले मोडसह एलसीडी पॅनेल आहे. नवीन मॉडेलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथसह (Blue Tooth) यामाहाची वाय-कनेक्ट सिस्टीमदेखील आहे. तसंच यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमही (Traction Control System) आहे. कॉल आणि मेसेज अलर्ट, पेट्रोल लेव्हल, आरपीएम, पार्किंग रेकॉर्ड, राइडिंग हिस्ट्री अशी अनेक वैशिष्ट्ये या बाईकमध्ये उपलब्ध आहेत. जुन्या बाईकच्या तुलनेत फीचर्समध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. Volkswagen ची जबरदस्त Taigun SUV भारतात लाँच, काय आहे किंमत या नवीन बाईकचे डिझाइनही (Design) आधीच्या बाईकपेक्षा खूपच वेगळे आहे. नवीन आर 15 डिझाइनच्या बाबतीत यामाहा R7 वरून प्रेरित असल्याचे दिसते. नवीन आर 15ला अधिक स्पोर्टी आणि एरोडायनामिक फेअरिंग डिझाइन लाभले आहे. डेल्टा बॉक्स फ्रेमवर आधारित या बाईकचे वजन 142 किलो आहे. आधीच्या आर15मधील ट्विन एलईडी सेटअपची जागा सिंगल बाय-फंक्शनल एलईडी हेडलॅम्पनं घेतली आहे. मस्क्युलर फ़्युएल टँकसह गोल्डन ब्रेक कॅलिपर, सीटची वैशिष्ट्यपूर्ण रचना थ्रीडी एम्ब्लेम, मेटॅलिक ग्रे कलर स्कीम आणि उंच विंडस्क्रीन यामुळे या बाईकच्या देखणेपणात भर पडली आहे. नवीन यामाहा R15मध्ये मोनो-शॉकसह 37 मिमी इन्व्हर्टेड फोर्क्स असून, आधीच्या बाईकमध्ये टेलीस्कोपिक फोर्क्स होते. ब्रेकिंग हार्डवेअर मात्र सारखेच आहे. नवीन आर 15मध्येही ड्युअल-चॅनेल एबीएससह 282 मिमी फ्रंट आणि 220 मिमी रियर डिस्क ब्रेक्स आहेत. Ola नंतर आता आणखी एक E-Bike लॉन्च, किंमत पेट्रोल बाईकपेक्षाही कमी! नव्या आणि जुन्या बाईकमध्ये अनेक बदल असले तरी एका बाबतीत मात्र त्यात साधर्म्य आहे, ते म्हणजे इंजिन. दोन्हीमध्ये BS6- अनुरूप 155 सीसी, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. ते 18 बीएचपी पॉवरसह 14 एनएम टॉर्क देते. स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6स्पीड गिअरबॉक्स आहे. नवीन बाईकमध्ये गिअरशिफ्टसाठी क्विकशिफ्टर आहे. या अनेक नवीन बदलांमुळे नवीन R15 ची किंमत (Price) मात्र आधीच्या बाईकपेक्षा वाढली आहे. नवीन आर15 च्या स्टँडर्ड मॉडेलसोबत हायर-स्पेक R15M व्हेरियंटदेखील दाखल केले आहे. जुन्या R15 ची किंमत (एक्स-शोरूम, दिल्ली) 1.58 लाख होती तर नवीन R15 ची किंमत 1.68 लाख ते 1.80 लाखांच्या दरम्यान आहे.
  First published: