ऑक्टोबरपासून कारमध्ये नवीन टेक्नोलॉजी, मोदी सरकारकडून लवकरच नियम लागू

ऑक्टोबरपासून कारमध्ये नवीन टेक्नोलॉजी, मोदी सरकारकडून लवकरच नियम लागू

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने जुलै महिन्यात एक नियमावली जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : महामार्गावर होत असलेल्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वाहन नियमावलीमध्ये बदल केले जात आहे. पुढील महिन्यात अर्थात ऑक्टोबरपासून कारमध्ये नवीन टेक्नॉलाजी देणे बंधनकारक असणार आहे.  यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सह इतर उपकरणांचा समावेश आहे.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने जुलै महिन्यात एक नियमावली जाहीर केली आहे. यात गाड्यांमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) कारमध्ये असणे गरजेचं असल्याचे स्पष्ट केले आहे. आता नव्या नियमावलीनुसार, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), स्पीड अलर्ट, ग्लेजिंग ग्लास, रिव्हर्स पार्किंग सिस्टम सारखे फिचर्सही आता कारमध्ये असणे बंधनकारक असणार आहे.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने नवीन नियमावलीसाठी सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार, आता ऑक्टोबर महिन्यात नवीन यंत्रणा लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही नवीन यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम टेक्नोलॉजी कारमध्ये लावल्यामुळे जेव्हा टायरमध्ये हवेचे प्रमाण कमी झाले तर चालकाना याबद्दल अलर्ट मिळतो. किंवा हवेचे प्रमाण जास्त झाले तरीही आपोआप सायरन वाजायला लागतो. त्यामुळे चालकाना तातडीने उपाय योजना करता येते. बऱ्याच वेळा टायर फुटल्यामुळे अपघाताचे प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे या टेक्नोलॉजीमुळे अपघात रोखता येईल.

रिव्हर्स पार्किंग सिस्टिम

नवीन नियमावलीनुसार, गाडीत रिव्हर्स पार्किंग सिस्टिम लावणे आता बंधनकारक करण्यात येणार आहे. जेव्हा गाडी मागे घ्यायची असेल तेव्हा चालकाना मागील बाजूबद्दल माहिती मिळेल. त्यामुळे वाहन मागे घेण्यास सोईचे होईल. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिममध्ये जेव्हा कार भरधाव वेगात असेल तेव्हा ब्रेक लावल्यानंतर कार पलटणार नाही. जर चालक मर्यादेपेक्षा जास्त वेगात गाडी चालवत असेल तर त्याला अलर्ट मिळेल.

सेफ्टी ग्लेजिंग ग्लास

उन्हाळ्यात कारमध्ये थंड वातावरण कायम राहावे यासाठी सेफ्टी ग्लेजिंग ग्लास लावणे आता बंधनकारक असणार आहे. ही उपकरणं पुढील महिन्यात प्रत्येक कारमध्ये लावणे आता बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर कारमध्ये पंचर रिपिअर किट सुद्धा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या नवीन उपकरणामुळे गाडीत स्टेपनी अर्थात एक्सट्रा टायर ठेवण्याची आवश्यता नाही, असं स्पष्ट सरकारने स्पष्ट केले आहे.

भारतात एक एप्रिल 2020 पासून BS6 इंधन उत्सर्जन मानक लागू करण्यात आले आहे. भारतात BS4 मानकावरून थेट आता BS6 मानक लागू करण्यात आले आहे. यामुळे भारत आता युरोपीय मानकांसोबत बरोबरी करणार आहे.  BS6 मानकामुळे भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्री युरोप, जपान आणि अमेरिकाशी बरोबरी करणार आहे.

Published by: sachin Salve
First published: September 13, 2020, 4:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या