जगभरात वाढली Unused Mobile ची संख्या, 27 देशांमध्ये आहेत तब्बल इतके फोन

जगभरात वाढली Unused Mobile ची संख्या, 27 देशांमध्ये आहेत तब्बल इतके फोन

जगभरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंपैकी स्मार्टफोनला सर्वात जास्त मागणी आहे. वेगवेगळ्या कंपन्या महिन्याला अनेक स्मार्टफोन बाजारात आणत असतात. एक मोबाईल जास्तवेळ न वापरता नागरिक नवीन मोबाईल घेतात.

  • Share this:

मुंबई : जगभरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंपैकी स्मार्टफोनला सर्वात जास्त मागणी आहे. वेगवेगळ्या कंपन्या महिन्याला अनेक स्मार्टफोन बाजारात आणत असतात. एक मोबाईल जास्तवेळ न वापरता नागरिक नवीन मोबाईल घेतात. जुना स्मार्टफोन चालू असताना देखील लोकं नवीन स्मार्टफोन विकत घ्यायला पसंती देतात. त्यामुळे जगभरात अनयुज्ड स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पडून आहेत. एका सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार पडून असलेल्या या स्मार्टफोनचे वजन 54 बोइंग 747-8 या विमानांच्या वजनाइतकं आहे. 27 देशांमधील हा सर्व्हे असून केवळ या देशांमध्ये पडून असलेल्या स्मार्टफोनचीच ही संख्या आहे.

पडून असलेल्या मोबाईलची किंमत किती?

या ऑनलाईन सर्व्हेमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टोअर रिबॉय आणि 27 देशांचा सहभाग होता. यामधील अनेक लोकांना स्मार्टफोन नष्ट करणे हे मोठे आव्हान वाटत आहे. स्वीडनमध्ये न वापरात असलेल्या स्मार्टफोनचे प्रमाण प्रती व्यक्ती 1.3 इतके आहे. यामुळे स्वीडनमध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त मोबाईल फोन पडून आहेत. घरात पडलेल्या या स्मार्टफोनला बाजारात काहीही किंमत नाही पण एकत्रितपणे याच्या किमतीचा विचार केल्यास याची एकूण किंमत 1.9 अरब युरो आहे.

इतकं आहे या अनयूज्ड मोबाइलचं वजन

ऑनलाईन सर्व्हेमध्ये डेन्मार्कमध्ये 49 टक्के लोकं मोबाईल विकतात किंवा गिफ्ट करतात. त्यानंतर फ्रान्स आणि पोलंडमध्ये 41 टक्के नागरिक मोबाईल विकतात किंवा नातेवाईकांना गिफ्ट करतात. या 27 देशांमधील पडून असलेल्या मोबाईलचं वजन 23,964 टन आहे. हे वजन 54 बोइंग 747-8 या विमानांच्या वजनाइतकं आहे. तसंत या मोबाईलचं आणि 138 ब्लू व्हेलचं वजन एकसारखंच आहे. एका व्हेल माश्याचं वजन 173 टन इतकं असतं.

या काळात स्मार्टफोनची खरेदी

लवकरच अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे सेल लागणार आहे. त्याचबरोबर ख्रिसमसदेखील लवकरच येणार आहे, त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळते, म्हणून स्मार्टफोन विकत घेणाऱ्यांची संख्याही वाढते. या खरेदीमुळे पडून राहणाऱ्या मोबाईलच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. मागील दशकामध्ये या दोन्ही प्रसंगी स्मार्टफोन, ई-रीडर, टॅब्लेट आणि गेम कन्सोलसारख्या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांनी जुने फोन तसेच ठेवून नव्या फोनचा वापर करायला सुरुवात केली, म्हणून ई-कचऱ्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलं. reBuy चे सीईओ फिलीप गटनार यांनी नागरिकांना ई कचऱ्याबाबत जागरूक करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी आम्ही ही माहिती देत आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.

Published by: Shreyas
First published: November 18, 2020, 10:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading