आलिशान, आकर्षक आणि तगडी कार Land Rover Defender भारतात अखेर आली; पाहा किंमत आणि फीचर्स

आलिशान, आकर्षक आणि तगडी कार Land Rover Defender भारतात अखेर आली; पाहा किंमत आणि फीचर्स

जगात कुठल्याही वातावरणात स्मूथ चालेल अशी गाडी तयार करण्यात आल्याचा दावा आहे. जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर :  वर्षाच्या सुरुवातीलच Landrover ची Defender models भारतात मिळणार असं सांगण्यात येत होतं. पण ही गाडी जरा आता प्रत्यक्ष देशात लाँच झाली आहे. ही आलिशान आणि स्टर्डी SUV अनेकांची ड्रीम कार असावी अशी आहे. ग्राहकांना त्यांच्या मनाप्रमाणे रंग निवडण्याचं स्वातंत्र्य डिफेंडरने दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिअंट इथे उपलब्ध आहेत. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

डिफेंंडरचा 90 व्हेरिऐंट हा 73.98 लाख रुपयांना तर 110 व्हेरीऐंट हा 79.94 लाखाला उपलब्ध होणार आहे. तसंच या SUVs या गाड्या भारतात CBU द्वारे येणार आहेत.  SUVs Base, S, SE, HSE आणि First edition या पाच प्रकारात उपलब्ध आहेत.  आणि Defender 110 ची डिलिव्हरीही लगेचच सुरू करण्यात येणार आहे. तर 90 हे मॉडेल पुढच्या वर्षात 2021 मध्ये मिळेल.

या नवीन डिझाईनमध्ये कमीत कमी फ्रंट आणि मागील ओव्हरहॅन्ग्ज आहेत. नवीन 4×4 ला Roof  सरळ स्टॅंड आणि लाईट विंडो मिळणार आहे.

हे कंपनीचं अतिशय कस्टमाईझ वाहन आहे. ग्राहक फूजी व्हाईट, आयगर ग्रे, सॅटोरोनी ब्लॅक, सिलव्हर, तासमान ब्लू, पेंगिया ग्रीन, आणि गोंडवाना स्टोन या सात रंगापैकी कुठलाही रंग आपल्या गाडीसाठी निवडू शकतात. या गाडीची चाके ही 45.72 सेमी स्टिलच्या रिम्सपासून तयार केले आहेत.

तसेच या गाडीत डॅश माऊंट गेअर जे शिफ्टसह सेंट्रल फ्रंट सीट शी जी जोडले जातात. तसेच 110 या मॉडेल मध्ये 52 चे सीटींग कॉन्फिगरेशन उपलब्ध आहे. तसेच 1,075 लीटर पर्यंत लोडस्पेस आणि 2,380लीटर लोडस्पेस आहे. तसेच 90 मॉडेलमध्ये 6 लोक बसू शकतात.

नवीन डिफेंडर  62,000 पेक्षा जास्त चाचण्यांमधून गेलेली आहे. तसेच या गाड्या अनेक चाचण्यांमधून गेलेल्या आहेत.‌आणि मगच कंपनीने त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत.

विकास चाचणी दरम्यान प्रोटोटाइप मॉडेलने पृथ्वीवरील काही सर्वात कठोर वातावरणात कोट्यावधी किलोमीटरचे अंतर कापले आहे. वाळवंटातील 50 डिग्रीपासून आक्टिकच्या 40 डिग्रीत ते  पर्वतांमधील 10,000 फूट उंचीवरही गाडीची चाचणी झाली आहे.

तसेच नवीन बॉडी आर्किटेक्चरमध्ये अनुक्रमे 291 मीमी 110 अप्रोचेस देते. तसेच यात 38, 28, 40 डिग्री पर्यंत ब्रेक ओवर देण्यात आले आहे. तसेच यात 900 मीमी टेरिन रिस्पॉन्स सिस्टम देण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेल या मॉडैलची निवड करणे अतिशय सोपे आहे. तसेच नवीन डिफेंडर ही कुठल्याही वातावरणात चालणारी अशी गाडी आहे. ज्यात प्लग इन हायब्रीड इलेक्ट्रॉनिक व्हीकल पुढच्या वर्षी देण्यात येणार आहे. तसेच यात पेट्रोल लाईन अप 4 सिलिंडर P300 आणि पॉवरफुल 6 सिलिंडर p400 इलेक्ट्रॉनिक वेइकल टेक्नॉलॉजी मध्ये देण्यात आले आहेत. तसेच ग्राहक चार सिलिंडर प्रकारांपैकी डी 200 आणि डी 240 निवडू शकतात.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 16, 2020, 11:36 AM IST
Tags: car

ताज्या बातम्या