Home /News /auto-and-tech /

होंडाची Grazia नव्या रुपात, नव्या दमात; 6 वर्षांची वॉरंटी आणि 3 वर्ष फ्री सर्व्हिसिंग!

होंडाची Grazia नव्या रुपात, नव्या दमात; 6 वर्षांची वॉरंटी आणि 3 वर्ष फ्री सर्व्हिसिंग!

ग्राजिया 125 मध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS) देण्यात आली आहे.

    मुंबई, 24 जून : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने बुधवार ग्राज़िया (Grazia) 125cc BSVI लाँच केली आहे.  BS6 Honda Grazia ला अपडेटेड इंजिन, नवीन लुक आणि जास्त फिचर्स देण्यात आले आहे. होंडाने या दमदार स्कूटरची किंमत 73,336 रुपये (X-शोरूम नवी दिल्ली) इतकी जाहीर केली आहे. या स्कूटरमध्ये 125cc इंजिन देण्यात आले आहे. सोबतच स्कूटरमध्ये इंस्ट्रूमेंट डिस्प्ले सुद्धा देण्यात आला आहे. यामध्ये  गाडीत एकूण किती इंधन आहे, सध्या किती इंधन खर्च झाले आहे याची माहिती मिळणार आहे.  सोबतच ईलिंग स्टॉप सिस्टम आणि साइड स्टँड इंडिकेटर, मीटर 3-स्टेप ECO इंडिकेटर, क्लॉक, स्पीडची सूचना मिळणार आहे. एचएमएसआईचे व्यवस्थापक यदविंदर सिंह गुलेरिया यांनी सांगितलं की, 'नवीन ग्राजिया 125 बीएसवीआईला ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन आकर्षक आणि स्टाईलशील लूक देण्यात आला आहे'. ग्राजिया 125 मध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS) देण्यात आली आहे. जे पुढील आणि मागील चाकांमध्ये ब्रेकिंग उर्जेचं समान वाटप करेल. सिस्टम ब्रेकिंगमुळे वाहनचालकाचे संतुलन कायम राहिल. Hero ची आली आतापर्यंतची सर्वात वेगवान बाइक, 4.7 सेंकदात सुसाट सीट अनलॉक करण्यासाठी एक नवीन मल्टी-फंक्शन स्विच देण्यात आले आहे. तसंच पेट्रोल भरण्यासाठी बाहेर झाकण दिले आहे. तसंच   टेलेस्कोपिक सस्पेंशन सेटअपही दिले आहे. या स्कूटरमध्ये 125 cc PGM-FI HET (होंडा इको टेक्नोलॉजी) इंजिन दिले आहे. जे कंपनीच्या  स्मार्ट पावर (ईएसपी) टेक्नोलॉजीसोबत आहे.  शानदार ऑफर नवी ग्राजिया मेट सायबर येलो, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल साइरन ब्लू आणि मॅट एक्सिस ग्रे या रंगात उपलब्ध आहे.  होंडा स्कूटरवर एक विशेष पॅकेजही देण्यात आले आहे. यामध्ये 6 वर्षांची वॉरंटी पॅकेज दिले आहे. तसंच 3 वर्षांपर्यंत फ्री सर्व्हिसिंग आणि 3 वर्ष पेड सर्व्हिस दिली आहे. संपादन - सचिन साळवे
    First published:

    पुढील बातम्या