मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /देशातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉंच, 75 पैशांत चालते एक किमी

देशातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉंच, 75 पैशांत चालते एक किमी

देशातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉंच, 75 पैशांत चालते एक किमी

देशातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉंच, 75 पैशांत चालते एक किमी

मुंबईतल्या पीएमव्ही इलेक्ट्रिक या कंपनीने देशातली पहिली मायक्रो ईव्ही लॉंच केली आहे. PMV Electric Eas-E 2 असं या नवीन मायक्रो ईव्हीचं नाव आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 17 ऑक्टोबर: इंधनाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि प्रदूषणाची समस्या बघता इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. ग्राहकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन अनेक कंपन्या खास फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स, कार्स बाजारात लॉंच करत आहेत. मुंबईतल्या पीएमव्ही इलेक्ट्रि कंपनीने 16 नोव्हेंबरला देशातली पहिली मायक्रो ईव्ही लॉंच केली आहे. या मायक्रो ईव्हीत खास फीचर्स देण्यात आली आहेत. या कारमुळे मोठ्या शहरांतलं प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या कमी होऊ शकते, असा दावा पीएमव्ही कंपनीने केला आहे. ही एक युनिक इलेक्ट्रिक कार आहे. या कारची वैशिष्ट्यं, फीचर्स यांविषयी जाणून घेऊ या.

  मुंबईतल्या पीएमव्ही इलेक्ट्रिक या कंपनीने देशातली पहिली मायक्रो ईव्ही लॉंच केली आहे. PMV Electric Eas-E 2 असं या नवीन मायक्रो ईव्हीचं नाव आहे. ही कार इको फ्रेंडली आणि मजबूत मोबिलिटी असलेली आहे. Eas-E ईव्ही ही मायक्रो कार असून, या कारमधून दोन प्रवासी प्रवास करू शकतात. या कारचा आकार 36 चौरस फूट आहे. PMV Electric Eas-E2 या नवीन मायक्रो कारची प्रारंभिक किंमत कंपनीने 4.79 लाख रुपये ठेवली आहे. कारचा बेस व्हॅरिएंट फक्त सुरुवातीच्या 10 हजार ग्राहकांसाठी आहे. उच्च दर्जाचा बॅटरी पॅक असलेल्या व्हॅरिएंटची किंमत अनुक्रमे 6.79 लाख आणि 7.79 लाख रुपये आहे. Eas-E मायक्रो कारसाठी जागतिक स्तरावर 6000 प्री- ऑर्डर मिळाल्या आहेत, असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवळ दोन हजार रुपयांत ही कार बुक करता येणं शक्य आहे.

  हेही वाचा: टोयोटाची पहिली CNG कार लाँच, काय आहे किंमत? वाचा सविस्तर

  PMV Electric Eas-E 2 मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक लहान इन्फोटेन्मेंट स्क्रीन देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी पीएमव्ही इलेक्ट्रिकने या मायक्रो ईव्हीमध्ये मोनोकोक चेसिस (मोनोकॉक चेसिसच्या चारही बाजूला एक शेल असतो आणि तो एकाच फ्रेममध्ये तयार केलेला असतो) देण्यात आला आहे. हा मोनोकोक चेसिस हाय स्ट्रेंग्थ मेटल कन्स्ट्रक्शनपासून तयार केला आहे. या ईव्हीमध्ये सिंगल ड्रायव्हर एअर बॅगही देण्यात आली आहे.

  PMV Electric Eas-E 2 मध्ये PMSM मोटर देण्यात आली आहे. ही मोटार 10 kw पॉवर आणि 50Nm टॉर्क जनरेट करते. ही कार ताशी 70 किलोमीटर वेगाने चालू शकते. कंपनीने Eas-E या कारमध्ये तीन बॅटरी पॅक दिले आहेत. या बॅटरी पॅकची रेंज अनुक्रमे 120 Km, 160 Km आणि 200 Km पर्यंत असेल. ही कार तीन ते चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. ही ईव्ही 75 पैशांपेक्षा कमी खर्चात 1 किलोमीटर अंतर पार करू शकते. या कारमधले बॅटरी पॅक IP67 रेटिंगचे आहेत. यामुळे पाण्यापासून बचाव होतो. तसंच यात 48 V Li Iron Phosphate सेल आहेत. यातला बॅटरी पॅक एकात्मिक रचना म्हणूनदेखील कार्य करतो. याचा अर्थ तो उत्तम स्ट्रक्चरल रिजिडिटीसाठी चेसिस मेंबर म्हणून वापरला जाऊ शकतो.

  याशिवाय रिमोट पार्क असिस्ट, रिमोट हॉर्न, फॉलो मी होम लाइट्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, क्रूज कंट्रोल आणि इलेक्ट्रिक ORVM ही या कारमधली खास वैशिष्ट्यं आहेत. तसंच PMV च्या Eas-E कनेक्ट अ‍ॅपचा वापर करून टाइट पार्किंग स्पेसमध्ये ही ईव्ही रिमोट पार्क करू शकता. या ईव्हीमध्ये एक फिट फ्री मोडही दिला गेला आहे. या मोडचा वापर करून तुम्ही ईव्ही स्टॉप-अँड गो ट्रॅफिकमध्ये स्टिअरिंग व्हिलवरच्या थंब कंट्रोलद्वारे ऑपरेट करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Car, Electric vehicles