Jio ने 3 वर्षात उभं केलं 4G नेटवर्क, 25 वर्ष देश अडकला होता 2Gमध्ये - अंबानी

Jio ने 3 वर्षात उभं केलं 4G नेटवर्क, 25 वर्ष देश अडकला होता 2Gमध्ये - अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीचे (RIL)चेअरमन मुकेश अंबानी यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वर्ल्ड (Digital Transformation World Series 2020)मध्ये बोलताना भारतात चौथी औद्योगिक क्रांती होणार, अशी ग्वाही दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : रिलायन्स इंडस्ट्रीचे (Reliance Industries)चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी डिजिटल ट्रांसफार्मेशन वर्ल्ड (Digital Transformation World series 2020)मध्ये भारतात चौथी औद्योगिक क्रांती होऊ घातली आहे, अशी ग्वाही दिली. डिजिटल कनेक्टिव्हिटी, क्लाउड कंप्यूटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, स्मार्ट डिव्हाइस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स अशा नव्या तंत्रज्ञानाने भारतात ही चौथी औद्योगिक क्रांती येणार असा विश्वास अंबानी यांनी या ऑनलाईन परिषदेत बोलताना व्यक्त केला.

Jio मुळे भारतात डेटा क्रांती आली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जिओ भारतीय बाजारात येण्याअगोदर 25 वर्ष देश 2G कनेक्टिव्हिटीमध्येच अडकला होता. पण जिओमुळे 3 वर्षात भारतभर 4G नेटवर्क उभं राहिलं. कॉलर्सना पूर्णपणे मोफक व्हॉइस कॉलिंग सेवा देणारं Jio हे एकमेव नेटवर्क होतं, असं त्यांनी सांगितलं.

बदलले आर्थिक व्यवहारांशी संबधित नियम, वाचा RBIच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

जगात सर्वात कमी टेरिफमध्ये मोबाईल नेटवर्क देणारी जिओ ही एकमेव सेवा आहे, असं अंबानी यांनी सांगितलं. घराघरात डेटा पोहोचवायचा असेल तर हेच करायला हवं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनामुळे गमवावी लागली नोकरी? या सोप्या मार्गांनी करा खर्चाचं नियोजन

"आता 130 कोटी भारतीयांच्या स्वप्नातली क्रांती डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे येऊ शकते. भारताचं डिजिटल सोसायटीमध्ये परिवर्तन होणं अवघड नाही आणि त्याच वेळी भारत आघाडीची डिजिटल अर्थसत्ताही बनू शकते", असं मुकेश अंबानी म्हणाले.

First published: October 9, 2020, 5:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या