Ninja H2 चालवताना दिसला धोनी, बाइकची किंमत वाचून थक्क व्हाल

भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी गेल्या आठवड्यात रांचीमध्ये बाइकवरून फेरफटका मारताना दिसला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 11:27 AM IST

Ninja H2 चालवताना दिसला धोनी, बाइकची किंमत वाचून थक्क व्हाल

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दरम्यानच्या काळात त्यानं लष्करी प्रशिक्षणही घेतलं. त्यानंतर तो शूटिंगमध्ये व्यग्र होता. गेल्या आठवड्यात रांचीमध्ये बाइक चालवताना धोनीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

धोनीच्या ताफ्यात अनेक महागड्या बाइक आणि कार आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धोनी चालवत असलेली बाइक Kawasaki Ninja H2 सुपरबाइक आहे.धोनीकडे असलेली निन्जा एच2 बाइक त्यानं 2015 मध्ये खरेदी केली होती. भारतात ही बाइक खरेदी करणारा धोनी पहिलाच व्यक्ती होती. त्यावेळी धोनीने 29 लाख रुपयांत बाइकची खरेदी केली होती.

Kawasaki Ninja H2 ही जगातील सर्वात पॉवरफुल बाइकपैकी एक आहे. या बाइकमध्ये एक सुपरचार्जर आहे. Kawasaki Ninja H2 मध्ये 998cc लिक्वीड कूल्ड, इनलाइन-फोर इंजिन आहे. यामधून 11,000rpm वर 200bhp इतकी पॉवर आणि 10,500rpm वर 113.5Nm इतका टॉर्क जनरेट होतो. याशिवाय क्षमता वाढवण्यासाठी Ram Air पर्यायसुद्दा आहे. यामुळे बाइकची ताकद 210bhp एवढी वाढू शकते. सध्या या बाइकची किंमत दिल्लीत 34.99 लाख रुपये इतकी आहे.

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 11:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...