मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /2022 Baleno Facelift कार आहे की वडापाव! मिनिटाला खपतेय एक कार

2022 Baleno Facelift कार आहे की वडापाव! मिनिटाला खपतेय एक कार

 Maruti Suzuki Baleno 2022 Facelift ही गाडी नुकतीच लाँच झाली. ती आपल्याकडे एवढी लोकप्रिय झाली आहे की नवीन बलेनोची 50 हजार बुकिंग्ज कमीत कमी वेळात झाली आहेत. काय आहे या गाडीची किंम आणि इतर फीचर्स?

Maruti Suzuki Baleno 2022 Facelift ही गाडी नुकतीच लाँच झाली. ती आपल्याकडे एवढी लोकप्रिय झाली आहे की नवीन बलेनोची 50 हजार बुकिंग्ज कमीत कमी वेळात झाली आहेत. काय आहे या गाडीची किंम आणि इतर फीचर्स?

Maruti Suzuki Baleno 2022 Facelift ही गाडी नुकतीच लाँच झाली. ती आपल्याकडे एवढी लोकप्रिय झाली आहे की नवीन बलेनोची 50 हजार बुकिंग्ज कमीत कमी वेळात झाली आहेत. काय आहे या गाडीची किंम आणि इतर फीचर्स?

    नवी दिल्ली, 25 मार्च - कोविड-19 (post COVID-19 car market in India ) महामारीनंतर वाहन बाजारात तेजी आली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीचा (Public Transport) वापर टाळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी सध्या कार विक्रीमध्ये (Car Selling) वाढ होताना दिसत आहे. वाढती मागणी पाहून वाहन उत्पादक कंपन्यांनीदेखील (Automotive Companies) अ‍ॅडव्हान्स्ड आणि नवीन मॉडेल्सच्या गाड्या लाँच करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कार कंपन्यांपैकी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) सध्या भारतात कार विक्रीबाबत आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीनं भारतीय ग्राहकांसाठी '2022 बलेनो' ही प्रीमियम हॅचबॅक (Premium Hatchback) कार लाँच केली आहे.

    Maruti Suzuki Baleno 2022 Facelift या गाडीची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6 लाख 35 हजार रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 9 लाख 49 हजार रुपये आहे. नुकताच या कारनं 50 बुकिंगचा टप्पा पार केला आहे. भारतीयांनी या गाडीला एवढी पसंती दिली हे की जवळपास मिनिटाला एक कार बुक होतेय असं वृत्त झी न्यूजनं दिलं आहे.

    वाचा- पत्नीला भेटण्यासाठी झाला उतावळा; VISA नसल्याने समुद्रामार्गे थायलंडहून मुंबईला निघाला पण...

     कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, नवीन बलेनोसाठी आतापर्यंत 50 हजार बुकिंग झाली आहेत. कार लाँच झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीमध्येच हा टप्पा ओलांडला गेला आहे. एकूण बुकिंग्जपैकी सुमारे 60 टक्के ग्राहकांनी कारच्या सहा एअरबॅग असलेल्या मॉडेलची निवड केली आहे. कंपनीनं अनेक नवीन फीचर्ससह एकदम नवीन अवतारात बलेनो मार्केटमध्ये आणली आहे.

    लक्झरी फीचर्सचा समावेश

    2022 मारुती सुझुकीनं बलेनोतील उत्कृष्ट आणि हाय-टेक फीचर्सची संपूर्ण यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा, 9-इंचाचा स्मार्टप्ले, आर्किमीझ ट्युनिंगसह प्रो प्लस सिस्टमचा यासारख्या लक्झरी फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय, बलेनोसोबत देण्यात आलेलं न्यू जनरेशन सुझुकी कनेक्ट अ‍ॅप (Suzuki Connect App) हे कारमधील सर्वात मोठा बदल आहे. सुझुकीचं न्यू जनरेशन अ‍ॅप 40 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स प्रदान करतं. हे कनेक्ट फीचर्स इंटरनेटवर चालतात.

    वाचा- व्यक्तीच्या उंचीवरूनही समजू शकतात त्याच्या व्यक्तिमत्त्वातले गुण आणि दोष; कसे ते वाचा

     यामध्ये अ‍ॅमेझान अ‍ॅलेक्साचाही (Amazon Alexa) समावेश आहे. मारुती सुझुकीनं नवीन बलेनो सबस्क्रिप्शनवरदेखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळं 13 हजार 999 रुपये मासिक हप्ता भरून ग्राहक ही कार घरी आणू शकतात.

    अ‍ॅडव्हान्स्ड 1.2-लिटर के-सीरीज पेट्रोल इंजिन

    नवीन बलेनोसोबत 1.2-लीटर अ‍ॅडव्हान्स्ड के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलेलं आहे. पूर्वीपेक्षा हे इंजिन खूपच चांगलं असून आरामदायी प्रवासासाठी कारमध्ये नवीन सस्पेंशनही बसवण्यात आले आहेत. कारचं इंजिन साधारणपणे 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी व्यवस्थेत 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे.

    एक्सटिरियर आणि इंटिरियरमध्ये बदल

    कारच्या केबिन आणि एक्सटेरियरमध्ये अनेक बदल करण्यात आले असून सुरक्षेच्यादृष्टीनंसुद्धा ही कार पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे. बाहेरील बाजूने क्रोम गार्निश, शार्प एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि एलईडी डीआरएल नव्यानं देण्यात आले आहेत. तर, जुन्या मॉडेलमधील साइड मिररवरील इंडिकेटर आणि क्रोम हँडल तसेच ठेवण्यात आले आहेत. टेललाइट्स अधिक स्लिम केल्यानं कारचा मागील भाग पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाला आहे. टेललाइट्सला (Taillights) एल-आकार दिला असून ते नवीन एलईडी सिग्नेचरसह मिळत आहेत. कंपनीनं पाच नवीन रंगांमध्ये 2022 बलेनो उपलब्ध करून दिली आहे. ही कार दिसायला खूपच आकर्षक झाली असून ग्राहकांना ती नक्कीच आवडेल, असं म्हटलं जात आहे.

    सुरक्षिततेच्या दृष्टीनं मजबूत

    मारुती सुझुकीनं नवीन बलोनोमध्ये सहा एअरबॅगसह 360-डिग्री कॅमेरा आणि 20 पेक्षा जास्त मजबूत सेफ्टी फीचर्स (Safety Features) देऊ केले आहेत. सेगमेंटमध्ये पहिल्यांदा 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे ड्रायव्हरला खूप मदत होऊ शकते. कारच्या मागील बाजूस एसी व्हेंट देण्यात आलं आहे. हे फीचर यापूर्वी कारमध्ये नव्हतं. नवीन कारला 16-इंच अलॉय व्हिल्स आहेत.

    वाचा- रात्री झोप येत नाहीये?, अमेरिकन आर्मीचं 'हे' टेक्निक एकदा नक्की करून पहा

    भारतीय बाजारपेठेत, 2022 बलेनोला, ह्युंदाई आय20 (Hyundai i20), टाटा अल्ट्रोझ (TATA Altroz), होंडा जॅझ (Honda Jazz) आणि फॉक्सवॅगन पोलो (Volkswagen Polo) यांच्याशी थेट स्पर्धा करावी लागणार आहे. मारुती सुझुकी इंडियातील सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे सीनिअर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात दर तीन मिनिटांना एक बलेनो प्रीमियम हॅचबॅक विकली जातं आहे.

    आतापर्यंत झालेलं बुकिंग पाहता भारतीय ग्राहकांना 2022 बलेनो आवडली असल्याचं म्हटलं जात आहे.

    First published:
    top videos

      Tags: Car, Maruti suzuki cars