मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /ही खरंच Maruti 800 कार आहे? एकदा पाहाच हा VIDEO

ही खरंच Maruti 800 कार आहे? एकदा पाहाच हा VIDEO

मारुती 800 (Maruti 800) काही वर्षांपूर्वी मारुती कंपनीचं हे मॉडेल तुफान लोकप्रिय झालं होतं. 'कुटुंबाची कार' अशी ओळख या कारला मिळाली होती.

मारुती 800 (Maruti 800) काही वर्षांपूर्वी मारुती कंपनीचं हे मॉडेल तुफान लोकप्रिय झालं होतं. 'कुटुंबाची कार' अशी ओळख या कारला मिळाली होती.

मारुती 800 (Maruti 800) काही वर्षांपूर्वी मारुती कंपनीचं हे मॉडेल तुफान लोकप्रिय झालं होतं. 'कुटुंबाची कार' अशी ओळख या कारला मिळाली होती.

    मुंबई, 01 डिसेंबर : आपल्याकडे कार (Car) असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. आज बाजारात विविध कंपन्यांच्या अनेकविध फीचर्स असलेल्या कार्स उपलब्ध आहेत. परंतु, काही कार्स अशा आहेत, की ज्या गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. मारुती 800 (Maruti 800) ही त्यापैकीच एक. काही वर्षांपूर्वी मारुती कंपनीचं हे मॉडेल तुफान लोकप्रिय झालं होतं. 'कुटुंबाची कार' अशी ओळख या कारला मिळाली होती. अनेक जण भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रातली गेमचेंजर म्हणून मारुती 800 कडे पाहतात. 31 वर्षं विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या मारुती 800 चं उत्पादन 2014 मध्ये बंद करण्यात आलं. काही जणांनी त्यांच्याकडील मारुती 800 गाडीत आमूलाग्र बदल (Refine) केले आहेत. हे बदल नक्कीच आश्चर्यचकित करणारे आहेत. Vwraps सीकर यांनी मारुती 800 मध्ये केलेल्या बदलांचा एक व्हिडिओ यू-ट्यूब चॅनेलवर (Youtube Channel) अपलोड केला आहे. या व्हिडिओत मारुती 800 चं सुधारित रूप दिसत आहे.

    Vwraps सीकर यांनी मारुती 800 मध्ये अनेक बदल केले आहेत. यात मारुती 800 ला एक वेगळाच कलर देण्यात आला आहे. दरवाज्याच्या हॅंडल्सना काळा रंग (Black color) देण्यात आला आहे. वरील बाजूला एक नवा हेडलॅप (Head Lamp) बसवण्यात आला आहे. हे हेडलॅम्प गोलाकार आहेत. परंतु त्यात एलईडी एलिमेंट आणि एलईडी डेटाइम रनिंग लॅंप बसवण्यात आले आहेत. कारच्या बॉडी पॅनेलमध्ये बाकी लक्षणीय असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे.

    " isDesktop="true" id="637185" >

    मारुती 800 च्या इंटीरिअरमध्ये (Interior) बराच बदल करण्यात आला आहे. या कारमधील दरवाज्याचे पॅड्स, सीट्स, रूफ, स्टीअरिंग व्हील कव्हर आणि डॅशबोर्ड लाल रंगाचे आहेत. तसंच या कारमध्ये एक लहान कन्सोल (Console) सेंटर बसवण्यात आला असून कारमध्ये चार पॉवर विंडो आहेत.

    मारुती 800 कारमधील इन्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीअरिंग व्हील डिझाइन आणि एअर कंडिशन कंट्रोलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्टीअरिंग व्हीलला लाल आणि काळ्या रंगाचं कव्हर लावण्यात आलं आहे. या इंटीरिअरमध्ये एक मोठी टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टीम बसवण्यात आली आहे. ही अँड्रॉइड (Android) बेस्ड सिस्टीम आहे. तसंच यात पार्किंग कॅमेराही बसवण्यात आला आहे.

    फ्रंट ग्रिलवर हॉरिझॉन्टल स्लॅट्स आहेत. या स्लॅट्सला मिळताजुळता लूक बंपरला देण्यात आला आहे. यात फॉग लॅम्पदेखील बसवण्यात आला आहे. तो एलईडी सेटअपसह प्रोजेक्टर म्हणून वापरता येईल. या कारला फ्लेयर्ड साइड फेंडर बसवण्यात आले आहेत. ही कार रुंद टायरवर चालते. यात 5 स्पोक अॅलॉय व्हील्स देण्यात आली आहेत. ब्रेक कॅलिपर्सला लाल रंग देण्यात आला आहे. फ्रंट फेंडरवर एक छोटा बॅच लावण्यात आला असून, त्यावर 'स्पोर्ट्स' असं लिहिलेलं आहे. या कारला गोलाकार रिअरव्ह्यू मिरर (Rearview Mirror) असून, एक इलेक्ट्रिक सनरूफ (Electric Sunroof) आहे.

    IPL Retention Full List : कोहली, धोनी रोहितसह 27 खेळाडू रिटेन, पाहा संपूर्ण यादी

    कारच्या मागील बाजूस आफ्टर मार्केट टेल लॅंप असून, त्यात एलईडीचा आणि स्वायपिंग टर्न इंडिकेटर्सचा वापर करण्यात आला आहे. बंपरमध्ये रिफ्लेक्टर लाइट बसवण्यात आले असून, त्यात स्वायपिंग टर्न इंडिकेटर्सचा वापर करण्यात आला आहे. यात एक क्वाड एक्झॉस्ट आहे. परंतु सुरू असेल असं वाटत नाही. याशिवाय या मारुती 800 मध्ये एक रीअर स्पॉयलर आणि एक हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आहे. या लॅम्पला गडद कॉपर कलरनं फिनिशिंग करण्यात आला आहे, असं या व्हिडिओत दिसतं.

    First published:
    top videos