मुंबई : आधीच सगळ्या वस्तू महाग होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. त्यामध्ये आता तुमच्या आवडत्या स्मार्टफोन खरेदी करण्याचं स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे स्मार्टफोनच्या किंमती अवाक्याबाहेर जाऊ शकतात. पुन्हा एकदा स्मार्टफोन महाग होण्याची शक्यता आहे.
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार मोबाईल इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते भारतात स्मार्टफोनच्या बाजारात २०२३ मध्ये कमी उलाढाल होण्याची शक्यता आहे. महागाईच्या चिंतेने कंज्यूमर सेंटीमेंटवर दबाव पडतो. या महिन्याच्या सुरुवातीला विश्लेषकांनी २०२२ मध्ये उद्योगात घसरण झाल्याची माहिती दिली होती. तज्ज्ञांनी म्हटलं की, हे वर्ष फ्लॅट असू शकतं किंवा सिंगल डिजिटमध्ये वाढ होऊ शकते.
काउंटरपॉइंट रिसर्चने शुक्रवारी एका रिपोर्टमध्ये म्हटलं की, भारतात स्मार्टफोन शिपमेंटमध्ये २०२२ या वर्षात ९ टक्के घसरण होऊन १५२ मिलियन शिपमेंट झाली. तर २०२१ मध्ये ११ टक्के वाढ होऊन १६९ मिलियन युनिट झालं होतं. तेव्हा इतकी वाढ होण्याचं कारण रिमोट वर्क आणि शिक्षणासाठी लोकांनी स्मार्टफोनची खरेदी केली होती.
मोबाईल नंबर कोणालाही न दाखवता करा कॉल, कसं? ही ट्रिक करेल मदत
डिसेंबर २०२१ला संपलेल्या तिमाहीनंतर स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये घसरण झाली. काउंटरपॉइंटच्या आकड्यानुसार समजतं की सणांच्या सिजननंतर मागणी कमी झाल्याने डिसेंबरच्या तिमाहीत स्मार्टफोनच्या खरेदीत एक वर्ष आधीच्या तुलने ३० टक्के इतकी मोठी घसरण झाली.
आयडीसीचे नकवेंद्र सिंह यांनी म्हटलं की, मोबाइल कंपन्यांकडून भारतातील स्मार्टफोन बाजारातून उत्पन्न किंवा किंमती वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करतील. त्यामुळे २०२२ पर्यंत स्मार्टफोनच्या सरासरी विक्री किंमतीत सातत्याने वाढ झाली आहे आणि २०२३ मध्येही असेच होईल.
आता फोन बिलही वाढणार, टेलीकॉम कंपन्या टॅरिफ वाढवण्याच्या तयारीत!
स्मार्टफोन इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते या वर्षीही खरेदीत घसरण दिसून येईल. स्मार्टफोन शिपमेंट २०२३ पर्यंत सिंगल डिजिटमध्ये घसरण होऊ शकते. स्वस्तातले ५जी फोन लाँच झाल्यानंतरही घसरण सुरू राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile, Mobile Phone, Money