मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Maruti's First Car Owner : फक्त 52 हजारांमध्ये घेतली होती पहिली 'मारुती 800' कार, तीही इंदिरा गांधींच्या हस्ते!

Maruti's First Car Owner : फक्त 52 हजारांमध्ये घेतली होती पहिली 'मारुती 800' कार, तीही इंदिरा गांधींच्या हस्ते!

जी मारुती 800 हरपालसिंग यांनी खरेदी केली होती, तिची नंबर प्लेटही त्याकाळी विशेष लोकप्रिय ठरली.

जी मारुती 800 हरपालसिंग यांनी खरेदी केली होती, तिची नंबर प्लेटही त्याकाळी विशेष लोकप्रिय ठरली.

जी मारुती 800 हरपालसिंग यांनी खरेदी केली होती, तिची नंबर प्लेटही त्याकाळी विशेष लोकप्रिय ठरली.

    मुंबई, 27 सप्टेंबर : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) हा चारचाकी गाड्यांचा जुना आणि विश्वासार्ह ब्रॅंड. देशात आजही या कंपनीच्या गाड्यांना विशेष मागणी आणि पसंती आहे. मारुती सुझुकीची अनेक मॉडेल्स लोकप्रिय ठरतात. एक काळ असा होता, की चारचाकी गाडी उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांकडे असायची. सर्वसामान्य माणसासाठी अशी गाडी घेणं हे खूप मोठं स्वप्न असायचं. त्या काळी मारुती सुझुकीनं वाजवी दरातलं मॉडेल बाजारात आणलं आणि सर्वसामान्य माणसाचं स्वप्न साकार होण्यास एकप्रकारे मदतच केली. ती कार होती मारुती 800.

    80च्या दशकात मारुती सुझुकीच्या गाड्यांचा मोठा बोलबाला होता. आजही जेव्हा मारुती सुझुकीच्या देशातील एकूण वाटचालीविषयी चर्चा होते तेव्हा हरपालसिंग (Harpal Singh) हे नाव त्यात प्राधान्यानं घेतलं जातं. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. हरपालसिंग हे मारुती 800 (Maruti 800) ही चारचाकी खरेदी करणारे कंपनीचे पहिले ग्राहक होते. त्याविषयीची माहिती `नवभारत टाइम्स`नं दिली आहे.

    मारुती कंपनीने मारुती 800 ही कार जेव्हा बाजारात सादर केली, तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये या गाडीविषयी चर्चा सुरू झाली. त्या काळात केवळ दोन महिन्यांत 1.35 लाख कार्सचं बुकिंग झालं होतं. त्यामुळे अनेक ग्राहकांना गाडीसाठी दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली होती. परंतु, हरपालसिंग नशीबवान ठरले आणि पहिल्या गाडीची चावी घेण्याचा मान त्यांना मिळाला.

    चार लहान मुलं तलावात बुडाली, 13 वर्षांच्या आयुषने दोघांना वाचवलं, पण....

    मारुती 800 विषयी बोलताना तिचा रंजक इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ही कथा सुमारे 4 दशकांपूर्वी म्हणजेच 1980 मध्ये सुरू होते. तो काळ भारतात उदारीकरणाच्या सुरुवातीचा काळ होता. या कालावधीत संजय गांधी (Sanjay Gandhi) हे एक महत्त्वाकांक्षी स्वप्न पाहत होते; मात्र दुर्दैवानं जून 1980मध्ये त्यांचं विमान अपघातात निधन झालं. मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्तात कार खरेदी करता येण्याचं त्यांचं स्वप्न हळूहळू साकार होऊ लागलं. अर्थात त्याला कारणीभूत ठरला मारुती उद्योग लिमिटेड (Maruti Ltd.) हा उद्योगसमूह. या समुहानं मारुती 800 नावानं सर्वांत स्वस्त कार लॉंच केली. ही कंपनी भारत सरकार आणि जपानची सुझुकी मोटर कंपनी यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आली.

    मारुती सुझुकीनं 9 एप्रिल 1983 रोजी कारचं बुकिंग सुरू केलं. 8 जूनपर्यंत म्हणजेच केवळ 2 महिन्यांत 1.35 लाख कार्सचं बुकिंग झालं. आजच्या स्थितीनुसार हिशोब केला, तर हे बुकिंग खूपच मोठं होतं. कंपनीनं आपली पहिली कार मारुती 800 या नावानं बाजारात आणली. त्या वेळी तिची किंमत केवळ 52 हजार रुपये होती. कमी किंमत, चालवण्यास सोपी आणि चांगलं मायलेज यामुळे ती कार त्या काळी अन्य कार्सच्या तुलनेत अधिकच लोकप्रिय ठरली.

    ‘ती परत आलीये’ या मालिकेत कुणी तरी येणार येणार गं... ; हणम्या- टिक्याचा डोहाळे

    संजय गांधी यांच्या स्वप्नातली ही स्वस्त कार एवढी लोकप्रिय होईल, याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. बाजारात सुमारे 31 वर्षं या कारचं वर्चस्व राहिलं. आजही ही कार अनेक ग्राहकांची पहिली पसंती आहे; मात्र 2014 मध्ये मारुती 800 या कारचं उत्पादन बंद झालं. या 31 वर्षात कंपनीनं सुमारे 27 लाख 800 कार्सची विक्री केली. दरम्यानच्या काळात कंपनीने आल्टो 800 (ALTO 800) बाजारात आणली. या कारलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ग्राहकांचा एकूण प्रतिसाद पाहता मारुती 800 पुन्हा बाजारात आणली जाणार असल्याची म्हणजेच या गाडीचं रिलॉंच होण्याची चर्चा आहे.

    एकूणच मारुती 800 विषयी बोलताना मारुती सुझुकीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितलं, `हे सर्व अचानक नक्कीच घडलं नाही. त्या काळी चारचाकी गाड्यांना श्रीमंत वर्गाकडूनच मागणी असायची. त्यामुळे सरकारच्या यादीत खासगी ट्रान्सपोर्ट हे दुय्यम स्थानावर होतं. त्या काळी सरकार सार्वजनिक वाहतुकीवरच जास्त लक्ष केंद्रित करत असे; मात्र संजय गांधी यांनी स्वस्तातल्या कारचं जे स्वप्न पाहिलं ते त्यांच्या निधनानंतरही जिवंत राहावं, अशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका होती. या कारणामुळे तत्कालीन सरकारनं या कंपनीला मदतीचा हात दिला. या कारचे पार्ट्स आणि तंत्रविषयक बाबींना त्या वेळी कस्टममधून सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं बोललं जातं. परंतु, तसं नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. त्या काळी सरकारी कंपनीत विदेशी कंपन्यांचे शेअर नव्हते. परंतु, मारुती सुझुकी त्याला अपवाद ठरली. त्या वेळी परदेशी कंपन्यांच्या भागभांडवलास 40 टक्क्यांपर्यंत परवानगी मिळाली होती', असं भार्गव यांनी सांगितलं.

    दिल्लीतल्या हरपालसिंग यांना 14 डिसेंबर 1983 पर्यंत काही मोजकेच लोक ओळखत होते; मात्र मारुती 800 या गाडीचं लॉंचिंग होताच ते एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. मारुती 800 ही पहिली कार इंडियन एअरलाइन्सचे (Indian Airlines) कर्मचारी हरपालसिंग यांना देण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते कारची चावी घेतानाचं त्यांचं छायाचित्र भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्रीच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा बनून राहिलं.

    चार लहान मुलं तलावात बुडाली, 13 वर्षांच्या आयुषने दोघांना वाचवलं, पण....

    जी मारुती 800 हरपालसिंग यांनी खरेदी केली होती, तिची नंबर प्लेटही त्याकाळी विशेष लोकप्रिय ठरली. तिचा नोंदणी क्रमांक DIA-6479 असा होता. त्या वेळी ही गाडी खरेदी करण्यासाठी हरपालसिंग यांनी त्यांच्याकडची फियाट कार विकून टाकली. हरपालसिंग यांचं 2010 मध्ये निधन झालं. 1983 पासून अखेरपर्यंत ते हीच कार चालवत होते. 'ही कार मला देवाच्या कृपेनं मिळाली, त्यामुळे मी ती विकू शकत नाही,' असं ते नेहमी म्हणत. त्यांच्यानंतर ही कार रस्त्यावर दिसली नाही. त्यांच्या पार्किंगमध्ये ही कार पडून होती. ती कोणीही चालवत देखील नव्हतं.

    ‘ती परत आलीये’ या मालिकेत कुणी तरी येणार येणार गं... ; हणम्या- टिक्याचा डोहाळे

    रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या गाडीची छायाचित्रं व्हायरल झाली. त्यानंतर ही कार सर्व्हिस स्टेशनला नेऊन तिथं ती रिस्टोअर केली गेली. त्यानंतर अनेकांनी ही कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, हरपालसिंग यांच्या कुटुंबियांनी या कारच्या विक्रीस नकार दिला आहे. अनेक नागरिकांचं चारचाकीचं स्वप्न मारुती 800 मुळे प्रत्यक्षात आलं. आजही या कारची लोकप्रियता कायम आहे. ही कार आणि हरपालसिंग यांचं नातंदेखील अजरामर ठरलं आहे.

    First published:
    top videos