मारुती सुझुकीची मोठी घोषणा, WagonR आणि Baleno कार मागवल्या परत, कारण...

मारुती सुझुकीची मोठी घोषणा, WagonR आणि Baleno कार मागवल्या परत, कारण...

मारुती सुझुकीने आपले लोकप्रिय मॉडेल WagonR आणि Baleno च्या एकूण 1 लाख 34 हजार 885 गाड्या परत मागवल्या आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जुलै : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (Maruti Suzuki) ने आपल्या दोन लोकप्रिय कारबद्दल मोठी घोषणा केली आहे. मारुती सुझुकीने आपले लोकप्रिय मॉडेल WagonR आणि Baleno च्या  एकूण 1 लाख 34 हजार 885 गाड्या परत मागवल्या आहे.

मारुती सुझुकीने 5 नोव्हेंबर 2018 ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान तयार केलेल्या 1-लिटर पेट्रोल इंजिन WagonR आणि 8 जानेवरी 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 दरम्यान तयार केलेल्या बलेनो (पेट्रोल) गाड्या बाजारातून परत मागवल्या आहे. या गाड्यांमध्ये फ्यूल पंपमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, असं कंपनीला लक्षात आलं आहे. त्यामुळे मारुती सुझुकीने एवढा मोठा निर्णय घेतला आहे.

महिंद्राची दमदार Mojo 300 येतेय नव्या अवतारात, किती असेल किंमत?

ज्या गाड्यांमध्ये बिघाड झाला आहे, अशा WagonR च्या एकूण 56,663 गाड्यांची विक्री झाली आहे. तर बलेनोच्या  78,222 गाड्यांची विक्री झाली आहे. याच गाड्यांमधील फ्यूल पंपमध्ये बिघाड झाल्याचा कंपनीला संशय आहे. त्यामुळे या गाड्या परत मागवल्या असून कोणतेही दर न आकारता फ्यूल पंप बदलून देण्यात येणार आहे. त्यामुळे, ग्राहकांनी ज्या डिलरकडून गाडी विकती घेतली आहे, त्याच्याशी संपर्क साधावा, अशी विनंती केली आहे.

तुमच्या कारमध्ये बिघाड झाला हे कसं कळेल?

मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइट marutisuzuki.com वर तुम्ही तुमच्या कारबद्दल जाणून घेऊ शकता. वेबसाइटवरील  'Important Customer Info' सेक्शन दिले आहे, त्यावर क्लिक करावे लागणार आहे.

तिचा आवाज आणि ती.., काइनेटिक होंडाबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?

यात WagonR आणि Baleno गाड्या परत मागवण्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल आणि  त्याखाली 'Click here' ऑप्शन दिले आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यावर नवीन बॉक्स उघडेल त्यामध्ये तुम्ही कारचा चेसी नंबर टाकून माहिती मिळवू शकता.

Published by: sachin Salve
First published: July 15, 2020, 6:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading