‘या’ योजनेतून खरेदी न करता व्हाल कारचे मालक, मारुती घेऊन येतेय नवी सेवा!

‘या’ योजनेतून खरेदी न करता व्हाल कारचे मालक, मारुती घेऊन येतेय नवी सेवा!

मारुती कंपनीच्या ARENA साखळीतील स्विफ्ट, डिजायर, विटारा ब्रेज़ा आणि अर्टिगा या गाड्यांसाठी ही सुविधा मिळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जुलै : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकी लिमिटेड (Maruti Suzuki India Ltd) ने गुरुवारी ‘मारुती सुझुकी सब्सक्राइब’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून तुम्हाला कार लीज हक्काने घेता येणार आहे.

लाॅकडाऊनच्या काळात वाहन उत्पादन कंपन्यांना मोठा फटका बसला. कार, बाईकची विक्री कमालीची घटली होती. त्यामुळे आता वाहन उत्पादक कंपन्या नवनवीन ॲाफर घेऊन येत आहे. मारुतीने सुद्धा आपली लीज सब्सक्राइब सेवा बंगळुरू आणि गुरुग्राममध्ये सुरू केली आहे.

नव्या अवतारात लाँच झाली Honda WRV, दमदार फिचर्स आणि किंमत, पाहा PHOTOS

लीजवर वाहनं देणारी मारूती ही पहिली कंपनी नाही. मारुतीच्या आधी Volkswagen India (फॉक्सवॅगन इंडिया) ने ही सेवा सर्वात आधी सुरू केली होती.

जपानच्या कंपनीसोबत करार

मारुती कंपनीच्या ARENA साखळीतील स्विफ्ट, डिजायर, विटारा ब्रेज़ा आणि अर्टिगा या गाड्यांसाठी ही सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर NEXA सिरीजमधील Baleno, Ciaz आणि XL6 वर सुद्धा ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

चीनला भरणार धडकी, राफेल नंतर भारत रशियाकडून घेणार ‘ही’ अत्याधुनिक 33 लढाऊ विमानं!

कंपनी या योजनेवर मागील वर्षापासून काम करत होती. या योजनेच्या कामासाठी कंपनीने जपानच्या ORIX कोर्पोरेशन च्या ओरिक्स ऑटो इंफ्रास्ट्रक्चर सर्विसेज लिमिटेड सोबत करार केला आहे.

मारुती सुझुकी ही भारतात लीजवर कार देण्याच्या गटात पहिली कंपनी नाही.याधी प्रतिस्पर्धी Hyundai Motor India Ltd ने सुद्धा ही सेवासुरू केली होती. तर Mahindra and Mahindra (महिंद्रा ॲंड महिंद्रा) सुद्धा लीजवर आपल्या गाड देत आहे.

या व्यतिरिक्त बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंज सारख्या लक्झरी कार निर्माता कंपन्या सुद्धा ही सर्व्हिस देत. पण, मारुतीची योजनाही इतर कंपन्यांच्या तुलनेत वेगळी असणार आहे. मारुतीचे देशभरात पसरलेले जाळे या योजनेला लोकांपर्यंत पोहोचवण्यात जास्त फायदेशीर ठरणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 6:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading