मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

आता घरबसल्या करा कार एक्सचेंज; मारुतीची ग्राहकांसाठी नवी योजना

आता घरबसल्या करा कार एक्सचेंज; मारुतीची ग्राहकांसाठी नवी योजना

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बॅंक, अॅक्सिस बँक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, इंडसइंड बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, महिंद्रा फायनान्स आणि सुंदरम फायनान्स यांसह 14 संस्था सहभागी झाल्या आहेत.

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बॅंक, अॅक्सिस बँक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, इंडसइंड बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, महिंद्रा फायनान्स आणि सुंदरम फायनान्स यांसह 14 संस्था सहभागी झाल्या आहेत.

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बॅंक, अॅक्सिस बँक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, इंडसइंड बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, महिंद्रा फायनान्स आणि सुंदरम फायनान्स यांसह 14 संस्था सहभागी झाल्या आहेत.

मुंबई 10 जुलै: देशातली सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी आता घरबसल्या ऑनलाइन कार लोन (Online Car Loan) उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकी इंडियाने शुक्रवारी (9 जुलै 2021) आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन (Digital Platform) या देशव्यापी सुविधेची घोषणा केली. या माध्यमातून ग्राहकांना एंड-टू-एंड ऑनलाइन कार फायनान्स उपलब्ध करून दिला जाणार आहे. मारुती कंपनीने डिसेंबर 2020मध्ये ठरावीक शहरांमध्ये मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स (Maruti Suzuki Smart Finance) सुविधा सादर केली होते. आता अरेना (Arena) (मास मार्केट कार रिटेल चेन) आणि नेक्सा (Nexa) (प्रीमियम कार आउटलेट) या दोन्हींच्या देशभरातल्या ग्राहकांसाठीदेखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बॅंक, अॅक्सिस बँक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, इंडसइंड बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, महिंद्रा फायनान्स आणि सुंदरम फायनान्स यांसह 14 संस्था सहभागी झाल्या आहेत.

Royal Enfield घेताय? खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवाच

'एमएसआय'चे वरिष्ठ कार्यकारी संचालक ( विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं, की कार डीलरकडे जाण्यापूर्वी बहुतांश ग्राहक कार खरेदी प्रक्रिया ऑनलाइन सुरू करतात. यात कार आणि अर्थसाह्य अशा पर्यायांचादेखील समावेश आहे. ग्राहकांची बदलती व्यवहार पद्धती बघता कंपनीने मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स या नावाने एक डिजीटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या माध्यमातून ग्राहकांना एंड-टू-एंड (End-To-End) ऑनलाइन कार फायनान्सचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

अपघातापूर्वीच असा मिळणार अलर्ट; वाचा या Car च्या जबरदस्त फीचरबाबत

श्रीवास्तव यांनी सांगितलं, की आम्ही मागील वर्षी ठरावीक शहरांमध्ये एक पथदर्शी प्रकल्प राबवला होता. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 25 लाखांहून अधिक ग्राहक मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स प्लॅटफॉर्मशी जोडले गेले. 1.6 लाखांहून अधिक ग्राहकांनी ऑन-रोड किमतीची जुळवणी ऑनलाइन केली तर 40 हजारांहून अधिक ग्राहकांनी कर्जस्वीकृती पत्र ऑनलाइन डाउनलोड केले. या प्रतिसादामुळे ही सुविधा देशभरात सुरू करण्यासाठी आमचा आत्मविश्वास वाढला. अर्थसाह्य करणाऱ्या 14 संस्था आमच्या ग्राहकांना व्यक्तिगत अर्थसाह्यासाठी पर्याय उपलब्ध करून देत आहेत. मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्सच्या माध्यमातून ग्राहक अर्थविषयक सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतात तसंच ऑनलाइन कर्ज, योग्य कर्ज पुरवठादाराची निवड आणि योग्य कर्ज पर्यायाचीही निवड करू शकतात.

कंपनीने जुन्या कारच्या देवाण-घेवाणीसाठी (Car Exchange) एक फीचर सुरू केलं आहे. या माध्यमातून ग्राहकांना एक्स्चेंज स्वरूपात खरेदी करायची असेल, तर त्यांच्या सध्या वापरात असलेल्या कारची अंदाजे किंमत जाणून घेता येते. या व्यतिरिक्त या प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना सह-अर्जदार अर्थसाह्याचा पर्यायदेखील उपलब्ध होतो. त्यात ग्राहक प्रोफाइलचे व्यापक स्पेक्ट्रम कव्हर केलं जातं.

First published:

Tags: Car, Instant loans, Investment, Loan