मारुती सुझुकीची Mini SUV S-Presso लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मारुती सुझुकीची Mini SUV S-Presso लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मारुती सुझुकीची मिनी एसयुव्ही S-Presso ही कार 30 सप्टेंबरला लाँच होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : मारुती सुझुकीची मिनी एसयुव्ही S-Presso ही कार 30 सप्टेंबरला लाँच होणार आहे. मात्र, त्याआधीच त्याचे फीचर्स लीक झाले आहेत. Alto K10 पेक्षा वरच्या गटात मोडणारी या कारची टक्कर रेनॉल्ट क्वीडशी आहे. या कारचा फोटो व्हायरल झाला असून यात कारची केबिन काळ्या रंगाची असल्याचं दिसतं. दरवाज्याचं हँडलसुद्धा काळ्या रंगात असून लोअर स्पेक मॉडेलचं केबिन असल्याचं म्हटलं जात आहे. एसयुव्हीपर्माणेच मारुतीची ही कार STD, LXi, VXi आणि VXi मध्ये उपलब्ध होणार आहे.

कारमध्ये बेसिक फीचर्ससह काही बदल होतील. LXi मध्ये एसी आणि पॉवर स्टेअरिंग मिळेल. तर VXi मध्ये सेंट्रल लॉकिंगसह लेस एंट्री, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. याशिवाय मारुतीची स्मार्ट प्ले डॉक ऑडिओ सिस्टिम, फ्रंट पॉवर विंडो आहे. तसेच सर्व कारमध्ये साइड एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर, डिजिटल स्पीडॅमीटर आणि स्पीड अलर्ट सिस्टिम सारखे फीचर्स मिळतील.

वाचा : कार झाली स्वस्त! 2 लाखांपर्यंत मिळणार सूट

VXi मध्ये ड्रायव्हरशिवाय फ्रंट पेसेंजर एअरबॅग, वॉइस रिकग्निशनसह 7 इंचाचा स्मार्ट प्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टिम, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल, रिअर पार्सल ट्रे, 12V-अक्सेसरी सॉकिट असेल. कारच्या किंमतीबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. तरीही 3.3 लाख ते 4.5 लाखांपर्यंत कारची किंमत असू शकते.

Tiago, Harrier यासह TATA च्या या गाड्यांवर 90 हजारांपर्यंत सूट

बंपर धमाका! कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट

VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या

Published by: Suraj Yadav
First published: September 10, 2019, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading