Maruti कंपनीची खास ऑफर, कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंतची सूट!

Maruti कंपनीची खास ऑफर, कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंतची सूट!

कंपनीने गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी 40 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : सणासुदीच्या काळात मारुती सुझुकीने त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणल्या आहे. सध्या ऑटो सेक्टरमध्ये मंदीचा परिणाम दिसतं आहे. त्यामुळं विक्री वाढवण्यासाठी कंपन्या अनेक ऑफर देत आहेत. वर्षाच्या एक तृतियांश विक्री या काळात होते. ही संधी गेली तर याचा फटका कंपन्यांना बसू शकतो.

मारुती सुझुकीनं त्यांच्या गाड्यांवर मोठी सूट दिली आहे. कंपनीचे सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की मारुती कंपनी गाड्यांवर 40 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. गाड्यांसाठी कर्जाच्या व्याजदरात घट होण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कार घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण! दीड लाखात Alto तर अडीच लाखात खरेदी करा Swift

वाचा : कार झाली स्वस्त! 2 लाखांपर्यंत मिळणार सूट

गाड्यांची खरेदी घटली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने होलसेल किंवा फॅक्टरी डिस्पॅचमध्ये 36 टक्के घट झाली. एकूण वर्षात 94 हजार 728 गाड्यांची विक्री झाली. जुलै 2017 नंतर तिसऱ्यांदा कंपनीने एक लाखांपेक्षा कमी गाड्यांची विक्री केली आहे. 2018 मध्ये कंपनीला सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळं यावर्षी विक्री वाढवण्याचं आव्हान कंपनीसमोर आहे.

वाचा : कार घेताय? पाहा ऑगस्टमध्ये 'या' गाड्यांची झालीय सर्वाधिक विक्री

वाचा : बंपर धमाका! कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट

स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: maruti
First Published: Sep 19, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या