Home /News /auto-and-tech /

मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता Facebook वर दिसणार नाही ही गोष्ट!

मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता Facebook वर दिसणार नाही ही गोष्ट!

Facebook feature

Facebook feature

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांनी राजकीय ग्रुप्सबाबत (Political Groups) एक मोठी घोषणा केली आहे

मुंबई 28 जानेवारी : फेसबुकवर आता राजकीय ग्रुप्सची (Political Groups) शिफारस (Recommendation) केली जाणार नाही, अशी घोषणा फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांनी केली आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी फेसबुक कंपनीने हा निर्णय घेतला होता. दरम्यान, 2020च्या अखेरच्या तिमाहीत फेसबुकला चांगला नफा झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत 11.22 अब्ज डॉलर अर्थात 3.88 डॉलर प्रति शेअर एवढा नफा या कंपनीला झाला आहे. अमेरिकेच्या निवडणुकीपूर्वी निर्णय ऑक्टोबर 2020 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी फेसबुकने (Facebook) अमेरिकन युजर्सना राजकीय ग्रुप्सची (Political Groups) शिफारस न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याशिवाय, आता झुकरबर्ग यांनी असंही म्हटलं आहे, की न्यूजफीडमध्ये (Newsfeed) युजर्सना दिसणाऱ्या मजकुरातील राजकीय मजकुराचं (Political Content) प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. झुकरबर्ग यांनी सांगितलं, 'आम्ही लोकसमुदायाकडून (Community) मतं मागवली होती. त्यावरून आम्हाला असं कळलं, की लोकांना आता राजकीय मजकूर वाचणं/पाहणं फारसं आवडत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या सेवांमध्ये बदल करण्याचं नियोजन करत आहोत.' (हे वाचा-जुन्या वाहनांबाबत सरकारचा मोठा निर्णय; लागू होणार स्क्रॅपेज पॉलिसी) कंपनीच्या नफ्यात वाढ कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) काळात घरातच बसून असलेल्या नागरिकांमुळे फेसबुक युजर्सच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. तसंच, डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातून कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 'फॅक्टसॅट'द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी सांगितलं, की फेसबुकला ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत 11.22 अब्ज डॉलरचा म्हणजेच 3.88 डॉलर प्रति शेअर एवढा नफा झाला. त्याआधीच्या वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत हा नफा 53 टक्के अधिक आहे. (हे वाचा-Facebookमध्ये आता होणार बदल, बातम्यांसाठी नवे पर्सनलाईज्ड न्यूज फिचर) या कालावधीत कंपनीचं उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढून 28.07 अब्ज डॉलर झालं आहे. त्याशिवाय फेसबुकच्या युझर्सची मासिक संख्या (Monthly Userbase)12 टक्क्यांनी वाढून ती सुमारे 2.8 अब्ज एवढी झाली आहे. 2020च्या अखेरीपर्यंत फेसबुकमध्ये 58 हजार 604 कर्मचारी काम करत होते.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Facebook

पुढील बातम्या