कार आणि दुचाकीच्या इन्शुरन्समध्ये झाले मोठे बदल, 1ऑगस्टपासून नियम लागू

कार आणि दुचाकीच्या इन्शुरन्समध्ये झाले मोठे बदल, 1ऑगस्टपासून नियम लागू

वाहनावरील विमा नियमांमध्ये बदल केल्यामुळे कार आणि दुचाकी खरेदी करत असता ग्राहकांच्या खिश्याला आता जास्त कात्री लागणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जुलै : नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. 1 ऑगस्टनंतर वाहन विमावर जास्त रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. कारण, भारतीय विमा नियमन विकास प्राधिकरण (IRDAI) 'थर्ड पार्टी' आणि 'ऑन डॅमेज विमा' (Motor Third Party and Own Damage Insurances) संबंधी नियमात बदल केले आहे.

IRDAI ने दिलेल्या आदेशानुसार, जर तुम्ही नवीन कार विकत घेता तेव्हा तुम्हाला 3 किंवा 5 वर्षांसाठी विमा खरेदी करण्याची आवश्यकता नाही. वाहन उत्पादन कंपन्यांनी पॅकेज कव्हर परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे. 1 ऑगस्टपासून नवीन वाहन खरेदीवर याचा परिणाम दिसून येणार आहे.

ब्रँड इज ब्रँड! Mercedes-AMG GT Black सीरीज लाँच, टॉप स्पीड 325 kmph आणि किंमत..

वाहनावरील विमा नियमांमध्ये बदल केल्यामुळे कार आणि दुचाकी खरेदी करत असता ग्राहकांच्या खिश्याला आता जास्त कात्री लागणार नाही. कार आणि दुचाकीच्या किंमती या नवीन बदलामुळे स्वस्त होतील.  त्यामुळे लॉकडाउनच्या काळात लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. कारवर विमा घेत असताना जास्त कालावधीसाठी पॅकेज घ्यावे लागत होते. त्यामुळे कार खरेदी करणे लोकांना महाग जात होते, असं IRDAI ने म्हटलं आहे.

 काय आहे नियम?

लाँग टर्म विमा पॅकेजबद्दल 1 सप्टेंबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. लाँग टर्म म्हणजे, दुचाकी वाहनावर पाच वर्षांसाठी आणि चार चाकी वाहनांवर 3 वर्षांसाठी 'मोटर थर्ड पार्टी पॉलिसी' लागू होत होती. त्यानंतर विमा कंपन्यांनी लाँग टर्म पॅकेज आणले यात थर्ट पार्टी आणि ऑन डॅमेज कव्हरचा समावेश केला.

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आली Suzuki ची सुपर फास्ट बाइक, जाणून घ्या फिचर्स

काय आहे थर्ट पार्टी आणि ऑन डॅमेज कव्हर?

जर तुमच्या कारला कुठे अपघात झाला तर वाहन विमा कंपनी तुम्हाला दोन प्रकारे नुकसान भरपाई देत असते एक आहे थर्ड पार्टी कव्हर आणि ऑन डॅमेज कव्हर. मोटर वाहन कायद्यानुसार, सर्व कारमालकांना विमा करणे बंधनकारक असते. विमा करणारी ही पहिली पार्टी असते, तर दुसरी आणि तिसरी पार्टी ही तुम्ही ज्यांच्याकडून विमा घेतला आहे ती असते. तुमचे नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळावी यासाठी दावा करते.

त्यानंतर येते, विमा पॉलिसी विकत घेणाऱ्याचे नुकसान, ज्याला ऑन डॅमेज असे म्हणतात. यामध्ये एखाद्या अपघातात तुमच्या कारचे किती नुकसान झाले आहे, त्यानुसार, मोबदला दिला जातो.

Published by: sachin Salve
First published: July 28, 2020, 5:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या