Mahindra XUV300: क्रॅश टेस्टिंगमध्ये ही ठरली सर्वात सुरक्षित कार; काय आहेत फीचर्स?

Mahindra XUV300:  क्रॅश टेस्टिंगमध्ये ही ठरली सर्वात सुरक्षित कार; काय आहेत फीचर्स?

Mahindra XUV300 मध्ये दोन फ्रंट एअरबॅग आहेत. तसेच आपल्याला या कारच्या टॉप वेरिएंटमध्ये 7 एअरबॅग मिळतील. यासह कंपनीने या कारमध्ये रीअर पार्किंग सेन्सर आणि फ्रंट पार्किंग सेन्सर दिले आहेत. Mahindra XUV300 मध्ये आपल्याला सर्व टायरमध्ये डिस्क ब्रेक देखील मिळतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 जानेवारी: नुकत्याच झालेल्या ग्लोबल 'एनसीएपी'(GNCAP) क्रॅश कसोटीत Mahindra XUV300 ला  5 स्टार रेटिंग मिळाली आहे. #SaferCarsForAfrica अभियानाअंतर्गत या गाडीला हे 5 स्टार रेटिंग मिळाले असून 2017 पासून NCAP गाड्यांची टेस्टिंग करत असते. नुकत्याच करण्यात आलेल्या या गाडीच्या टेस्टिंगमध्ये या गाडीला अडल्ट (Adult) कॅटेगरीमध्ये 17 पैकी 16.42  गुण मिळाले असून लहान मुलांच्या(Child) कॅटेगरीमध्ये 49 पैकी 37.44 गुण मिळाले आहेत.

या गाडीविषयी आणि सुरक्षिततेच्या संदर्भात माहिती देताना GNCAP ने ही गाडी चालक आणि सहप्रवाशाला देखील उत्तम सुरक्षा प्रदान करत असल्याचे म्हटले आहे. अडल्ट व्यक्तींमध्ये डोके आणि मान सुरक्षित राहत असून लहान मुलांसाठी खास सीट असल्याने त्यांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ होत असल्याचे म्हटले आहे. गाडीच्या टेस्टिंगचा एक व्हिडी देखील GNCAP ने ट्विटरवर शेअर केला आहे.

हे देखील वाचा -  ऑनलाइन डेटिंग नको रे बाबा! भारतीयांना आहे ही भीती, Macfee चा अहवाल

Mahindra XUV300 चे  इंजिन

ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायसह उपलब्ध आहे. याच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1197cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 110Ps पॉवर आणि 200 Nm टॉर्क जेनरेट करते. याचबरोबर  याच्या डिझेल व्हेरिएंटमध्ये 1497cc चे इंजिन देण्यात आले आहे. 115Ps पॉवर आणि  300 Nm टॉर्क जेनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि स्वयंचलित ट्रांसमिशन पर्यायासह येते.

Mahindra XUV300 चे  सेफ्टी फीचर्स-

  महिंद्राच्या या गाडीमध्ये पुढील भागात दोन एअरबॅग देण्यात आल्या आहेत. रिअर पार्किंग सेंसरबरोबर फ्रंट पार्किंग सेन्सर देखील देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीमध्ये टॉप व्हेरिएन्टमध्ये 7 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे या गाडीच्या पुढील आंणि मागील बाजूच्या चाकांमध्ये डिस्क ब्रेक मिळणार आहेत.

Published by: Aditya Thube
First published: January 31, 2021, 7:33 AM IST

ताज्या बातम्या