Home /News /auto-and-tech /

स्वस्तात मस्त! फक्त 2700 रुपये EMI वर घरी घेऊन जा मारुतीची कार, वॉरंटी आणि सर्व्हिस फ्री!

स्वस्तात मस्त! फक्त 2700 रुपये EMI वर घरी घेऊन जा मारुतीची कार, वॉरंटी आणि सर्व्हिस फ्री!

या गाड्या सर्टिफायड असतात आणि कंपनी फ्री सर्विस आणि वॉरंटीची ऑफर सुद्धा देते.

    मुंबई, 06 सप्टेंबर : लॉकडाउनच्या काळात ठप्प झालेली ऑटो इंडस्ट्री आता वेगाने पुढे सरकत आहे. दररोज नवनवीन मॉडेल लाँच होत आहे. एवढंच नाहीतर गाड्यांची विक्रीही वाढली आहे. नवीन गाड्यांसोबत जुन्या गाड्यांच्या विक्रीही वाढली आहे. त्यामुळेच कार उत्पादन कंपन्यांनी जुन्या कार विक्रीलाही सुरुवात केली आहे. या गाड्या सर्टिफायड असतात आणि कंपनी फ्री सर्विस आणि वॉरंटीची ऑफर सुद्धा देते. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी  (Maruti Suzuki) जुन्या आणि चांगल्या परिस्थितीमधील कार विक्री करत आहे.  मारुती Truevalue स्टोरच्या माध्यमातून जुन्या कारची विक्री करत आहे. मारुतीच्या या स्टोरच्या वेबसाइटवर सुद्धा तुम्ही कारच्या किंमती पाहू शकता. Maruti Wagon R ही मारुतीची लोकप्रिय कार आहे.Truevalue स्टोर या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, Maruti Wagon R  2012 चे मॉडेल आहे. जे 66,027 किलोमीटर चालले आहे.  हे मॉडेल पेट्रोल व्हर्जन LXI आहे. पहिल्या मालकाकडून ही गाडी विक्री केली जात आहे. या कारची किंमतही 2.25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Maruti Swift - मारुतीची सुझुकीची लोकप्रिय स्विफ्टचे पेट्रोल मॉडेल उपलब्ध आहे. 2011 चे हे मॉडेल आहे. ही कार  55,313 किलोमीटर चालली आहे. या कारची किंमत फक्त 1.94 लाख रुपये इतकी आहे. मारुती Truevalue वर 2016 मॉडेलची ऑल्टो 800 एलएक्सआई 1.45 लाख रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारसोबत 1 वर्षांची वारंटी आणि 3 फ्री सर्विस सुद्धा दिले आहे.  29 हजार रुपये डाउन पेमेंट वर 2699 रुपये इतका EMI येतो. कर्जाची मुदत ही 5 वर्षांची आहे. याच किंमतीत इतरही मॉडेल उपलब्ध आहे. Mahindra First Choice - महिंद्राच्या फर्स्ट च्वाइस या वेबसाईटवर 2016 मॉडेल सर्टिफाइड Renault Kwid RKL ही 2.3 लाख रुपये इतकी किंमत आहे. या कारवर 14% इंट्रेस्ट रेट दिला आहे. 5 वर्षांच्या मुदतीवर  4300 रुपये इतका EMI मिळतो. या शिवाय कंपनीने 4 लाख पेक्षा कमी किंमतीतील सर्टिफाइड वॅगन आर, गो प्लस, ऑल्टो, स्विफ्ट सारख्या गाड्या विक्रीसाठी ठेवल्या आहे.  या गाड्यांच्या खरेदीवर EMI हा 7500 इतका येऊ शकतो.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या